Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी,कोणता आहे हा स्टॉक?

एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी,कोणता आहे हा स्टॉक?

Garware Technical Fibres Ltd : या कंपनीनं प्रथमच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक शेअरमागे ४ बोनस शेअर्स देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 11:23 AM2024-11-18T11:23:45+5:302024-11-18T11:24:20+5:30

Garware Technical Fibres Ltd : या कंपनीनं प्रथमच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक शेअरमागे ४ बोनस शेअर्स देत आहे.

Garware Technical Fibres Ltd company will give 4 bonus shares for one boom in share which is this stock details | एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी,कोणता आहे हा स्टॉक?

एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी,कोणता आहे हा स्टॉक?

Garware Technical Fibres Ltd : गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडनं प्रथमच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक शेअरमागे ४ बोनस शेअर्स देत आहे. या घोषणेचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या तेजीनंतर कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठल्याचंही दिसून आलं.

आज बीएसईवर कंपनीचा शेअर ४१२९.४५ रुपयांवर खुला झाला. काही वेळानंतर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढून ४५६७.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील नवा उच्चांक आहे. बीएसईवर कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३११६.१० रुपये प्रति शेअर आहे.

पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स

१४ नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीनं म्हटलं होतं की, पात्र गुंतवणूकदारांना १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर ४ नवे शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.

कंपनीची कामगिरी कशी?

गेल्या तीन महिन्यांत गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत २१.६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ६ महिने शेअर्स होल्ड केलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत ३९ टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात या बोनस शेअरने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना ४२ टक्के परतावा दिलाय. या शेअरची किंमत ५ वर्षात २८८ टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनीचा एक्स-डिव्हिडंड ट्रेड झाला होता. त्यानंतर कंपनीने प्रति शेअर ३ रुपये अंतिम लाभांश दिला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Garware Technical Fibres Ltd company will give 4 bonus shares for one boom in share which is this stock details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.