लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने महाराष्ट्रासह देशभरात सिलिंडरच्या किमती १ हजाराच्या पुढे गेल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी घरगुती सिलिंडरच्या किमतीत ३ रुपये ५० पैसे तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८ रुपयांनी वाढ केली. एका महिन्यात दोनवेळा किमतीत वाढ केल्याने सामान्यांना स्वयंपाक बनविणे आणि हॉटेलमध्ये जेवण करणे महागले आहे.
येथे काय स्थिती?
मुंबई ₹१००२.५०
दिल्ली ₹१००३
कोलकाता ₹१०२९
चेन्नई ₹१०१८
कसे वाढले दर ?
किंमत अनुदान
२०१४ ४१० रुपये ८२७ रुपये
२०२२ १००३ रुपये ०० रुपये