सरकारी तेल कंपन्यांनी या महिन्यातही गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठा दिलासा दिला आहे. डिसेंबर महिन्यातही कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही. अर्थात सर्वसामान्य नागरिकांना गॅस दर वाढीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. जर आपणही या महिन्यात एलपीजी सिलिंडर बूक करणार असाल, तर त्यापूर्वी जाणून घ्या, आपल्या शरहातील 14.2 किलोच्या सिलिंडरचे दर...
IOCL ने जारी केले नवे दर - इंडियन ऑईलने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आज घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. तसेच, गेल्या महिन्यात कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 115.50 रुपयांची घट करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून 19 किलो सिलिंडरच्या दरात कपात होताना दिसत होती.
गॅस सिलिंडरचे दर - राजधानी दिल्लीत 1 डिसेंबर 2022 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपये एवढी आहे. कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये एवढी आहे.
यापूर्वी केव्हा झाला होता किंमतीत बदल - यापूर्वी, 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात 6 ऑक्टोबरला बदल झाला होता. ऑक्टोबर महिन्यात घरगुती एलपीजीच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ झाली होती. तसेच यापूर्वी 22 मार्चरोजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली होती.
कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत - - दिल्ली - 1744 रुपये - मुंबई - 1696 रुपये- चेन्नई - 1891.50 रुपये- कोलकाला - 1845.50 रुपये