नवी दिल्लीः बजेट मांडण्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या आहेत. कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली असून, एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. 14.2 किलोचे 12 सिलिंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते. तुम्हाला याहून अधिक सिलिंडर हवे असल्यास बाजारभावाने खरेदी करावे लागतात.
सरकार दरवर्षी 12 सिलिंडरवर अनुदान देते. कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली असून, व्यापाऱ्यांना आता व्यावसायिक सिलिंडर्ससाठी 1550.02 रुपये मोजावे लागणार आहेत. शनिवारी वाढीव किमती लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर व्यापाऱ्यांना आता व्यावसायिक सिलिंडर्ससाठी 1550.02 रुपये द्यावे लागतील. सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलन दरात बदल यासारख्या घटक अनुदानाची रक्कम निश्चित करतात.
एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) देखील साबणाच्या किमती वाढलेल्या आहेत. साबणाच्या किमतीत 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. आता आपल्याला साबण विकत घेण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. एचयूएलचे मुख्य वित्त अधिकारी श्रीनिवास पाठक म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत पाम तेलाच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Gas Cylinder's New Price : गॅस सिलिंडर 'एवढ्या' रुपयांनी महागला, जाणून घ्या नवे दर
Gas Cylinder's New Price : बजेट मांडण्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:06 PM2020-02-01T12:06:43+5:302020-02-01T12:08:27+5:30