Join us

Gautam Adani पुन्हा बनले दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय, आता आंबानींनाही मागे टाकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 12:23 PM

गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

Adani Vs Ambani: गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. जर अदानींची संपत्ती अशीच वाढत राहीली, तर लवकरच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याची शक्यता आहे. अदानी आणि अंबानी यांच्या केवळ एका स्थानाचं आणि ६.२ अब्ज डॉलर्सचं अंतर आहे. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अदानी १४ व्या स्थानी आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे १३ व्या स्थानी असून ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.ब्लूमबर्गच्या नव्या यादीनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवशी ३.७१ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. तर मुकेश अंबानी यांना १.०१ अब्ज डॉलर्सचा फायदा झाला. गेल्या ३ दिवसांत अदानींच्या संपत्तीत २० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. एका आठवड्यात अदानींनी ७ स्थांनांची उडी घेतलीये.

अदानी समूहाच्या कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप बुधवारी वाढून १४.५४ लाख कोटींवर गेलंय. यापूर्वी जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती. शेअर्सच्या किंमतीत फेरफार, आर्थिक गैरव्यवहारांसारखे आरोप हिंडेनबर्ग अहवालातून अदानी समूहावर करण्यात आले होते. परंतु समूहानं सर्वच आरोपांचं खंडन केलं होतं.

टॅग्स :गौतम अदानीमुकेश अंबानीअदानीशेअर बाजार