Gautam Adani Business : गौतम अदानी यांच्या नेतृत्वात अदानी समूहाचा व्यवसाय देश-विदेशात पसरलेला आहे. पण, आता गौतम अदानींची नजर थेट ‘हिमालय’ वर खिळली आहे. अदानी समूह शेजारील देश भूतानमधील गेलेफू माइंडफुलनेस सिटीमध्ये गुंतवणुकीसाठी प्रयत्न करत करत आहे. भूतान आपल्या दक्षिण सीमेवर मेगा टाउनशिप प्रकल्प सुरू करणार असून, अदानी समूह या प्रकल्पावर डोळा ठेवून आहे.
टाऊनशिप प्रकल्पात अदानींचा रसब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या प्रकल्पात अदानी समूहाच्या स्वारस्याचा संदर्भ देताना गेलेफूचे गव्हर्नर लोटे शेरिंग म्हणाले की, भूतान भारताच्या सीमारेषेजवळ सुमारे 1,000 चौरस किलोमीटर परिसात टाऊनशिप उभारण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पात सौरऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी अदानी समूहाशी बोलणी सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले, या भागात रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणी जागा शोधण्यात आल्या. यामध्ये आशियातील मोठ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करू शकतील अशा रस्ते, पूल आणि सुविधांच्या बांधकामासाठी नियोजित करारांचाही समावेश आहे. ऊर्जा प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पांव्यतिरिक्त येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदर बांधण्याचाही विचार आहे.
अदानी समूहाचा दबदबा वाढेलहा करार अदानी समूहासोबत झाला, तर शेजारील देशात अदानी समूहाचा दबदबा आणखी वाढेल. विशेष म्हणजे, अदानी समूह सध्या इस्रायल, केनिया, श्रीलंका, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये आपल्या विद्यमान प्रकल्पांचा विस्तार करत आहे.