Gautam Adani Trillionaire : पहिला ट्रिलिनेअर व्यक्ती २०२७ पर्यंत जगाला मिळू शकतो. एलन मस्क हे ट्रिलिनेअर बनणारे पहिले व्यक्ती असू शकतात. दुसऱ्या क्रमांकावर अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर असू शकतात. २०२७ पर्यंत गौतम अदानी यांची नेटवर्थ १ लाख कोटी डॉलर म्हणजेच 8,39,67,92,09,00,000 रुपयांवर पोहोचू शकते, असा अंदाज आहे. गौतम अदानी 2028 पर्यंत ट्रिलिनेअर बनू शकतात, त्यासाठी त्यांची संपत्ती वर्षाला १२३ टक्क्यांनी वाढायला हवी, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
ब्लूमबर्ग बिलिनेअर्सच्या यादीत एलन मस्क २३७ अरब डॉलर नेटवर्थसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गौतम अदानी ९९.६ अरब डॉलर नेटवर्थसह जगातील श्रीमंतांच्या यादीत १३व्या क्रमांकावर आहेत.
११० टक्क्यांनी वाढतेय एलन मस्क यांची संपत्ती
Informa Connect Academy ने केलेल्या एका अभ्यासातील निष्कर्षाप्रमाणे, टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स यासारख्या मोठ्या कंपन्याचे मालक असलेल्या एलन मस्क यांची संपत्ती वर्षाला ११० टक्क्यांनी वाढत आहे. या वाढीनुसार २०२७ पर्यंत एलन मस्क यांची नेटवर्थ चार पटींपेक्षा जास्त होईल. यावर्षी त्यांची संपत्ती ७.७३ अरब डॉलरने वाढली आहे.
...तर २०२८ मध्ये गौतम अदानी बनू शकतात ट्रिलिनेअर
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांची संपत्ती वर्षाला १२३ टक्क्यांनी वाढत आहे. रिपोर्टनुसार, याच वेगाने त्यांची नेटवर्थ वाढली, तर २०२८ मध्ये ते ट्रिलिनेअर बनतील. चालू वर्षात त्यांची संपत्ती १५.३ अरब डॉलरने वाढली आहे. आशियातील श्रीमंतांच्या यादी मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.