Join us

मुकेश अंबानींनी २० हजार कोटी गमावले, तर अदानींनी २ लाख कोटी कमावले; श्रीमंतांच्या यादीत अदानी घेणार गरुडझेप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 4:54 PM

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान रिलायन्स ग्रूपचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. पण लवकरच अदानी समुहाचे मालक गौतम अदानी मुकेश अंबानींना मागे टाकण्याची शक्यता आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान रिलायन्स ग्रूपचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. पण लवकरच अदानी समुहाचे मालक गौतम अदानीमुकेश अंबानींना मागे टाकण्याची शक्यता आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये. कारण २०२१ मध्ये अदानींच्या संपत्तीत झालेली वाढ पाहून अनेकांचे डोळे दिपले आहेत. दुसरीकडे मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. (gautam adani chasing high mukesh ambani just 12 billion dollar behind)

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गौतम अदानी हे श्रींमतीच्या तुलनेत मुकेश अंबानींच्या केवळ १२ अरब डॉलर (जवळपास २० हजार कोटी) मागे आहेत. गौतम अदानी ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये १९ व्या स्थानावर आहेत. अदानींची एकूण संपत्ती ६२.७० अरब डॉलर इतकी आहे. यंदाच्या वर्षात अदानींच्या संपत्तीत एकूण २९ अरब डॉलर (२ लाख कोटींहून अधिक) इतकी वाढ झाली आहे. २०२१ या वर्षात संपत्तीत सर्वाधिक वाढ होणाऱ्या श्रीमंतांच्या यादीत अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. 

विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षात संपत्ती वाढीच्या बाबतीत गौतम अदानी यांनी जेफ बेजोस, एनल मस्क, मार्क झुकरबर्ग, वॉरन बफेट, बिल गेट्स यांनाही मागे टाकलं आहे. अदानींच्या पुढे केवळ फ्रान्सचे बिलेनियर बेर्नार्ड अर्नाट आहेत. त्यांच्या संपत्तीत ४२.३० अरब डॉलर्सनं वाढ झाली आहे. 

२०२० या वर्षात अदानींची संपत्ती ५०० टक्क्यांनी वाढलीबिझनेस इनसायडरच्या अहवालानुसार २०२० या वर्षात अदानी यांच्या संपत्तीत तब्बल ५०० टक्क्यांनी वाढ झाली. गौतम अदानी सध्या देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि अदानी ग्रूपच्या एकूण सहा कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या सर्व कंपन्यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे. अदानींच्या सर्व कंपन्यांची एकूण किंमत ८० बिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे.  

टॅग्स :मुकेश अंबानीअदानीव्यवसाय