नवी दिल्ली : अदानी समूहाने इस्त्रायल इनोव्हेशन अथॉरिटीसोबत करार केला आहे, यासंबंधीची माहिती गुरुवारी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने दिली आहे. दरम्यान, या करारात अत्याधुनिक इनोव्हेशन प्लॅटफॉर्मची निर्मिती सामील आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या करारानंतर अदानी एंटरप्रायझेस इस्त्रायली स्टार्टअप्सकडून तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देऊ शकतील.
करारामुळे, अदानी समूह हवामान बदल, सायबर, एआय, आयओटी, 5जी आणि अॅग्रीकल्चरसाठी टेक्नॉलॉजी विकसित करेल. हे सर्व अदानी समूहाचे मूळ व्यवसाय आहेत. इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटी (IIA) ही सार्वजनिकरित्या अनुदानित एजन्सी आहे, जी इस्रायलच्या इनोव्हेशन धोरणांवर देखरेख करते. इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीला IIA असेही म्हणतात. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, IIA नवीन विचार पुढे नेण्यासाठी सशर्त अनुदान प्रदान करते. IIA भविष्यातील टेक्नॉलॉजीचा पाया घालण्यासाठी पायाभूत सुविधा देखील प्रदान करते. हे सहकार्य गेल्या सहा वर्षांत इस्रायलमध्ये अदानीने स्थापन केलेल्या विद्यमान भागीदारी आणखी वाढवेल, असे एका निवेदनात म्हटले आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "अदानी समूह इस्त्रायली स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर नावीन्यपूर्ण कंपन्यांमधून निवड करण्यास सक्षम असेल. मंजूर झालेल्या प्रकल्पांना अदानी समूहाकडून मदत केली जाईल आणि इस्त्रायल इनोव्हेशन अथॉरिटीकडून मदत केली जाईल. अदानी समूहाच्या हवामान बदल आणि शेतीपासून सायबर, आयई आणि 5G पर्यंतच्या जवळपास सर्व प्रमुख व्यवसायांचा या करारात समावेश आहे.
'इस्रायलमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोठे पाऊल'
करारावर भाष्य करताना अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिडेटचे सीईओ करण अदानी म्हणाले की, इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीसोबतची भागीदारी इस्रायलमधील आमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक मोठे पाऊल ठरले आहे. हे आम्हाला शेकडो अत्याधुनिक टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्यासपीठ देते आणि त्याचवेळी ते इस्रायलला उत्पादन सुरू ठेवण्यासाठी प्रेरित करत आहे.