Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani News : अदानी समूहानं तयार केली १ अब्ज डॉलर्सची वॉर चेस्ट; मोठा धमाका करण्याच्या तयारीत

Adani News : अदानी समूहानं तयार केली १ अब्ज डॉलर्सची वॉर चेस्ट; मोठा धमाका करण्याच्या तयारीत

Adani Group News : अदानी समूहानं १ अब्ज डॉलरची वॉर चेस्ट तयार केली आहे. अदानी समूह ३ कंपन्या विकत घेण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:02 PM2024-09-02T12:02:56+5:302024-09-02T12:05:00+5:30

Adani Group News : अदानी समूहानं १ अब्ज डॉलरची वॉर चेस्ट तयार केली आहे. अदानी समूह ३ कंपन्या विकत घेण्याच्या तयारीत आहे.

gautam adani group adani wilmar readies 1 billion war chest for fmcg biz in talks to acquire 3 companies | Adani News : अदानी समूहानं तयार केली १ अब्ज डॉलर्सची वॉर चेस्ट; मोठा धमाका करण्याच्या तयारीत

Adani News : अदानी समूहानं तयार केली १ अब्ज डॉलर्सची वॉर चेस्ट; मोठा धमाका करण्याच्या तयारीत

Adani Group News : अदानी समूहानं १ अब्ज डॉलरची वॉर चेस्ट तयार केली आहे. पॅकेज्ड कन्झ्युमर गुड्सच्या देशातील वाढत्या बाजारपेठेत समूहाच्या फूड आणि एफएमसीजी व्यवसायाला चालना देणं हे यामागील उद्दीष्ट आहे. या योजनेचा एक भाग म्हणून अदानी विल्मर लिमिटेड अंतर्गत समूहाचा फास्ट मुव्हींग कन्झुमर गुड्स बिझनेस देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात किमान तीन मसाले, रेडी टू कुक फूड आणि पॅकेज्ड एडिबल ब्रँड खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

ही अदानी समूहासाठी एक आक्रमक कॅपेक्स योजना आहे. अदानी विल्मर पुढील दोन ते तीन वर्षांत अनेक अधिग्रहण करणार असल्याची माहिती दोन जणांनी दिली. अदानी आणि विल्मर यांचा संयुक्त उपक्रम असलेली ही कंपनी खाद्यतेल, गव्हाचं पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यासारख्या मुख्य वस्तूंसह फूड आणि एफएमसीजी उत्पादनांच्या श्रेणीत कार्यरत आहे. लाईव्ह मिंटनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. त्यांचा फ्लॅगशिप ब्रँड फॉर्च्युन ११३ मिलियन घरांपर्यंत पोहोचतो. २०२२ मध्ये अदानी विल्मरनं पॅकेज्ड राईस ब्रँड कोहिनूर विकत घेतला.

याबाबत अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं ई-मेलद्वारे मागितलेल्या प्रतिक्रियेला दिला नाही. "जसं आम्ही पहिलेच संकेत दिले होते की ही अशी गुंतवणूक आहे, ज्याद्वारे आम्ही आनंदी आहोत. ते (विल्मर) आमचे दीर्घकालीन भागीदार आहेत आणि हा व्यवसाय आणखी मोठा होऊ शकतो. आम्ही विल्मर सोबत केलेल्या चर्चांनुसारच काम करत आहोत. अधिग्रहणाचा प्रश्न आहे, तिकडे मला अदानी विल्मरला ज्यांचं अधिग्रहण करायचं आहे त्याची माहिती आहे," असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नुकत्याच मिंट सोबत साधलेल्या संवादादरम्यान म्हटलं होतं.

कंपनी खरेदीची योजना

"समूह दक्षिण भारतातील मसाले आणि रेडी टू कूक फूड बिझनेसमध्ये असलेली कंपनी खरेदी करण्याच्या विचारात आहे. याशिवाय पूर्व भारतातील आणखी एक कंपनी खरेदी करण्याचीही त्यांची योजना आहे. दोन्ही प्रतिष्ठीत नावं आहेत. नियोजित अधिग्रहण समूह दोन्ही क्षेत्रांना तात्काळ पाय रोवण्यास मदत करू शकतात," असं एका सूत्रानं सांगितलं.

Web Title: gautam adani group adani wilmar readies 1 billion war chest for fmcg biz in talks to acquire 3 companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.