गौतम अदानी यांच्या मालकीच्या अंबुजा सिमेंट्स लिमिटेडनं (ACL) सांघी इंडस्ट्रीजचं अधिग्रहण केलं. या कंपनीशी अदानीचं नाव जोडल्याबरोबर गुंतवणुकदारांमध्ये चर्चेत नसलेल्या या संघी इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्यानं 5 टक्क्यांचे अपर सर्किट लागत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी हा शेअर 110.65 वर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे.
अदानी समुहाने सिमेंट सेक्टरमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे, गौतम अदानी यांनी आता आपल्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका कंपनीचा समावेश केला आहे. अदानी समुहाची अंबुजा सिमेंट या कंपनीनं आता सांघी सिमेंट कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट सांघी इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांकडून ५६.७४ टक्के हिस्सा खरेदी करेल.
गुरूवारी कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिली. अंबुजा सिमेंटची डील 5000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये झाला आहे. अंबुजा सिमेंट सध्याच्या प्रवर्तक समूह रवी सांघी अँड फॅमिलीकडून सांघी इंडस्ट्रीजमधील बहुसंख्य स्टेक घेणार आहे. हे अधिग्रहण तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
काय म्हटलं कंपनीनंया करारामुळे अंबुजा सिमेंटचा बाजारपेठेत दर्जा मोठा होणार आहे. या संपादनामुळे आम्ही 2028 पर्यंत आमची सिमेंट क्षमता दुप्पट करू. कंपनी सिमेंट उत्पादनात 140 एमटीपीए लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सांघी इंडस्ट्रीजकडे अब्जावधी टन चुनखडीचा साठा आहे आणि अंबुजा सिमेंट सांघीपुरम येथील सिमेंट क्षमता पुढील 2 वर्षांत 15 एमटीपीएपर्यंत वाढवणार असल्याचं गौतम अदानी म्हणाले.
शेअरधारकांची भागीदारीही घेणारयाव्यतिरिक्त, अंबुजा सिमेंट सांघी इंडस्ट्रीजच्या सार्वजनिक भागधारकांकडून अतिरिक्त 26 टक्के स्टेक किंवा 6.71 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर देईल. या ओपन ऑफरची किंमत प्रति शेअर 114.22 रुपये असेल. यासाठी अदानी समूह 767.15 कोटी रुपये खर्च करणार आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)