Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani And Gautam Adani Loan: श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर!

Mukesh Ambani And Gautam Adani Loan: श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर!

Mukesh Ambani And Gautam Adani Loan: भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 09:47 PM2022-05-31T21:47:59+5:302022-05-31T21:49:22+5:30

Mukesh Ambani And Gautam Adani Loan: भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे.

gautam adani group and mukesh ambani reliance industries have 8 25 billion doller foreign debt | Mukesh Ambani And Gautam Adani Loan: श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर!

Mukesh Ambani And Gautam Adani Loan: श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर!

नवी दिल्ली:रिलायन्स इंडस्ट्रिजचे (Reliance Industries) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अदानी समूहाचे (Adani Group) प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या १० क्रमांकात आहेत. अलीकडील ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १०२ बिलियन डॉलर इतकी असून ते जगातील ७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९३ बिलियन डॉलर एवढी असून ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत. मात्र, या दोन्ही समूहांवर कोट्यवधींचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे विदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण विदेशी कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे. बँक ऑफ बडोदाने भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या विदेशी कर्जाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे. 

अदानी-अंबानी यांच्यावर ६३ हजार कोटींचे कर्ज

 बँक ऑफ बडोदा अहवालात म्हटले आहे की, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी विदेशी कर्जदारांकडून ३८.२ बिलियन डॉलर (भारतीय चलनात २.९ लाख कोटी रुपये) कर्ज घेतले आहे. यापैकी मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह आणि गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्यांवर ८.२५ बिलियन डॉलरचे (भारतीय चलनात ६३ हजार कोटी) कर्ज आहे. गेल्या ८ वर्षांत भारतीय कंपन्यांनी २६० बिलियन डॉलरचे विदेशी कर्ज घेतले आहे. हे कर्ज परदेशी भांडवली बाजार, व्यावसायिक बँका आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांकडून घेतले आहे.

अदानी-अंबानींच्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ३३ लाख कोटींवर

अदानी समूहाचे गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती १९० अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दोघांच्या सर्व कंपन्यांचं एकूण बाजारी भांडवल एकत्रित केले तर ते ३३ लाख कोटी रुपयांपेक्षा (४२९ बिलियन डॉलर) अधिक आहे. भारतीय कंपन्या आपली भांडवलासंबंधित गरज पूर्ण करण्यासाठी एक्सटर्नल कमर्श‍ियल बोरोविंग्सकडून विदेशी कर्ज घेतात. हा कर्ज पुरवठा युरोप, जपान आणि यूएस सारख्या देशांकडून केला जातो. भारतीय बँकांच्या तुलनेत हे कर्ज अधिक स्वस्त असते. कारण विकसित देशांचे व्याजदर विकसनशील देशांपेक्षा कमी आहेत.
 

Web Title: gautam adani group and mukesh ambani reliance industries have 8 25 billion doller foreign debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.