अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर अदानींच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. दरम्यान, आता काही दिवसापासून अदानी समुहाच्या शेअरने पुन्हा मोठी झेप घेतली. आता माध्यम क्षेत्रातही अदानी समुहाने दबदबा निर्माण केला आहे. AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी आहे, या कंपनीने आता क्विंटिलियन बिझनेस मीडियामधील ४९% भागभांडवल संपादन पूर्ण केले आहे. या बातमीनंतर क्विंटलीयन बिझनेस मीडियाशी निगडित कंपनी क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडच्या शेअरला चांगलीच गती मिळाली.
हा करार पूर्ण झाल्यानंतर आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर १० टक्क्यांपर्यंत चढला. ट्रेडिंग दरम्यान, शेअरची किंमत १२८.९४ रुपयांवर पोहोचली. याआधी सोमवारी शेअरमध्ये ५ टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी शेअर ७९.७० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
MG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने हा करार ४७.८४ कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला आहे. या कराराची प्रक्रिया २०२२ मध्ये सुरू झाली. अदानी समूहाची मीडिया क्षेत्रातील ही दुसरी मोठी डील आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, समूहाने नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) मधील कंट्रोलिंग बहुमताची हिस्सेदारी विकत घेतली होती.
Adani Group: अदानींना आणखी एक झटका, 'या' निर्णयामुळे पुन्हा आपटले शेअर्स; लागलं लोअर सर्किट
क्विंट डिजिटल मीडियाने आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसर्या तिमाहीत १८.४७ कोटी रुपयांचा एकूण परिचालन महसूल नोंदवला. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत २६% वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत महसूल १४.६५ कोटी रुपये होता. नऊ महिन्यांच्या महसुलात १३५% वाढ झाली आहे. कंपनीने राइट इश्यूद्वारे गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये उभे केले आहेत.