Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Group DB Power News: अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली? 

Adani Group DB Power News: अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली? 

Adani Group DB Power News:अदानी समूहाकडे पैशांची कमतरता नाही, तर मग करार मध्येच का सोडला, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 02:24 PM2023-02-16T14:24:15+5:302023-02-16T14:24:55+5:30

Adani Group DB Power News:अदानी समूहाकडे पैशांची कमतरता नाही, तर मग करार मध्येच का सोडला, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

gautam adani group gives up bid to acquire db power know about the reasons | Adani Group DB Power News: अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली? 

Adani Group DB Power News: अदानींचा पाय आणखी खोलात! ७ हजार कोटींच्या करारातून माघार; पैसे असूनही ही वेळ का आली? 

Adani Group DB Power News: हिंडेनबर्ग संस्थेचा रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूहाला प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागत आहे. गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत अदानी २४व्या क्रमांकावर घसरले. तसेच अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले. अदानी समूहाकडून आणला जात असलेला एफपीओ रद्द करण्यात आला. यातच आता ७ हजार कोटींच्या करारातून अदानी समूहाला माघार घ्यावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. 

अदानी ग्रुपने गेल्या वर्षी १८ ऑगस्ट रोजी डीबी पॉवर ७ हजार ०१७ कोटींमध्ये खरेदीचा करार केला होता. वीज क्षेत्रातील हा अदानी समूहाचा दुसरा सर्वात मोठा विलीनीकरण आणि अधिग्रहण करार होता. आधीच्या करारानुकसार ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अधिग्रहण पूर्ण व्हायचे होते. तेव्हा अदानी समूहाने भांडवली खर्चासाठी पुरेशी रोकड आहे आणि हा करार वेळेत पूर्ण होईल, असा दावा केला होता. मात्र त्यांनी अनेक वेळा मुदत वाढवली. त्याची अंतिम शेवटची तारीख १५ फेब्रुवारी होती पण अदानी समूह वेळेत करार पूर्ण करू शकला नाही.
 
कंपनीचे सात राज्यांत सात थर्मल प्लांट

अदानी पॉवरची एकूण स्थापित क्षमता १३.६ गिगावॅट आहे. कंपनीचे सात राज्यांत सात थर्मल प्लांट, तसेच ४० मेगावॅटचे सोलर प्लांट आहे. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार कंपनी एकूण ३६ हजार ०३१ कोटी रुपयांच्या कर्जात बुडाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, गेल्या काही काळापासून अदानी ग्रुप आक्रमकपणे अनेक क्षेत्रासह जगभरात व्यवसायाचा विस्तार करत होता पण २४ जानेवारी रोजी आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने त्याला ब्रेक लावल्यास दिसत आहे.

अदानी समूहाने डीबी पॉवर खरेदीची योजना सोडून दिली

अदानी समूहाचे मार्केट कॅपमध्ये १०० अब्ज डॉलरपेक्षा घट झाली आहे.  आपल्याकडे पैशांची कमतरता नसल्याचे या गटाचे म्हणणे आहे. या कालावधीत अदानी समूहाने डीबी पॉवर खरेदीची योजना सोडून दिल्याचे वृत्त समोर आले आहे. अदानी समूहाकडे पैशांची कमतरता नाही, तर मग त्यांनी करार मध्येच का सोडला, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, बाजारातील आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी समूह आपली आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर देत आहे. यासाठी अदानी समूह आपले कर्ज कमी करत असून तारण ठेवलेल्या शेअर्सची पूर्तता करत आहे आणि रोकड वाढवत आहे. डीबी पॉवर डीलमधून बाहेर पडणे या धोरणाचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gautam adani group gives up bid to acquire db power know about the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.