Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानींची नजर आता Electric कार्सवर, Uber सोबत होऊ शकते भागीदारी

अदानींची नजर आता Electric कार्सवर, Uber सोबत होऊ शकते भागीदारी

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अदानी समूह उबर टेक्नॉलॉजीजसोबत धोरणात्मक भागीदारीवर काम करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:09 PM2024-02-26T12:09:07+5:302024-02-26T12:09:32+5:30

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अदानी समूह उबर टेक्नॉलॉजीजसोबत धोरणात्मक भागीदारीवर काम करत आहे.

gautam Adani group now eyeing electric cars could partner with Uber zero emission | अदानींची नजर आता Electric कार्सवर, Uber सोबत होऊ शकते भागीदारी

अदानींची नजर आता Electric कार्सवर, Uber सोबत होऊ शकते भागीदारी

बाजार भांडवलाच्या दृष्टीनं भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं व्यावसायिक घराणं असलेल्या अदानी समूहाची नजर आता इलेक्ट्रिक कारवर आहे. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी अदानी समूह उबर टेक्नॉलॉजीजसोबत धोरणात्मक भागीदारीवर काम करत आहे. उबेर टेक्नॉलॉजीजच्या राइड हेलिंग प्लॅटफॉर्मवर आपल्या इलेक्ट्रिक पॅसेंजर कार लाँच करणं आणि समूहाचं सुपर अॅप अदानी वन वर पकड निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट्य आहे.
 

२०२२ मध्ये लाँच झालेल्या अदानी वन अंतर्गत Uber च्या सेवा आणण्याचीही या भागीदारीची योजना आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि उबरचे सीईओ दारा खोसरोशाही यांच्यात २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.
 

कार्सची खरेदी करणार
 

अदानी समूह इलेक्ट्रिक प्रवासी वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे आणि उबरच्या सहकार्यानं याला आणखी गती मिळेल. बस, कोच आणि ट्रक यासारख्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांमध्ये त्यांची उपस्थिती आधीपासूनच आहे. जरी ते वाहन निर्मितीमध्ये नसले तरी, त्यांच्या बंदरे आणि विमानतळ व्यवसायात मोठ्या आंतरीक गरजा आहेत. अदानी समूह कार खरेदी करेल, ब्रँड करेल आणि उबरच्या नेटवर्कमध्ये जोडेल. अलीकडेच त्यांनी ३,६०० इलेक्ट्रिक बसेससाठी सरकारी टेंडरमध्ये बोली लावली होती.
 

उबरचा हेतू काय?
 

२०४० पूर्वी स्वतःला झीरो एमिशन मोबिलिटी प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवत उबरचा जगभरातील सध्याचा ताफा इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा मानस आहे. अदानी-उबर भागीदारीमध्ये भारतात इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या वापरला चालना देण्याची क्षमता आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब केल्यानं भारतातील गिग अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. उबरनं २०१३ मध्ये भारतात प्रवेश केला आणि त्यानंतर ३ अब्जाहून अधिक ट्रिप पूर्ण केल्या आहेत आणि आता ही सेवा १२५ शहरांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: gautam Adani group now eyeing electric cars could partner with Uber zero emission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.