Join us  

Gautam Adani : अदानी समुहाला मोठा दिलासा! कर्ज प्रकरणावर RBI' ने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 2:39 PM

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले आहेत, या आरोपामुळे अदानी समुहाचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले आहेत, या आरोपामुळे अदानी समुहाचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे आता अदानी समुहाला बँकांनी दिलेल्या कर्जावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.  आज आरबीआयची एमपीसीची बैठक झाली. यावेळी अदानी समुहा संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रतिक्रिया दिली आहे. 

'देशातील बँका कोणत्याही कंपनीच्या मार्केट कॅपच्या आधारे कर्ज देत नाहीत. कर्ज देण्याचे निकष वेगळे आहेत. देशातील बँकिंग क्षेत्र खूप मजबूत आहे, अशी प्रतिक्रिया आरबीआयचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांनी दिली. ही बाब अदानी समुहासाठी फारशी चिंताजनक नाही. देशाचे बँक क्षेत्र सातत्याने मजबूत होत आहे यात शंका नाही, असंही दास म्हणाले. 

एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआयच्या अध्यक्षांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अदानी समुहा संदर्भात सुरू असलेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली. 'देशाच्या बँकिंग क्षेत्रात बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा कोणताही गवगवा नाही. देशातील बँकिंग क्षेत्र सातत्याने ताकदीने पुढे जात आहे. भारतीय बँकिंग क्षेत्र मजबूत आहे, गेल्या तीन-चार वर्षांत, आरबीआयने ही लवचिकता मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आम्ही आमचे मूल्यांकन केले आहे. रेटिंग एजन्सी त्यांचे स्वतःचे मूल्यांकन करतात., असंही शक्तिकांत दास म्हणाले. 

RBI चा कर्जदारांना धक्का; रेपो रेट पुन्हा वाढवल्यानं EMI आणखी वाढणार, 'बजेट' कोलमडणार!

'बँका कर्ज देत असताना कंपन्यांचे मार्केट कॅप पाहत नाही, त्याच्या आधारे कर्ज देत नाही. यासाठी वेगळे नियम आहेत. कंपनीला कर्ज देताना बँक कंपन्यांची ताकद आणि मूलभूत तत्त्वे विचारात घेते. या दोन गोष्टींवर कंपनी बरोबर असेल तर इतर गोष्टी विचारात घेतल्या जातात. “आम्ही बँकांचे नियमन करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणली आहेत. लेखापरीक्षण समित्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. बँकांमध्ये मुख्य राखीव अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेही आम्ही बंधनकारक केले आहे', असंही दास म्हणाले.

RBI चा कर्जदारांना धक्का

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा कर्जदारांना धक्का दिला आहे. रेपो रेट पुन्हा ०.२५ टक्क्यांनी वाढवले आहेत. आरबीआयच्या पतधोरणात बदल करताना व्याजदरात ०.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे. यासोबतच रेपो दरातही ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.५० टक्के झाला आहे.  'गेल्या जवळपास ३ वर्षांतील विविध आव्हानांमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांसमोर चलनविषयक धोरणाच्या पातळीवर आव्हान उभे राहिले आहे, असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले .

टॅग्स :गौतम अदानीबँकभारतीय रिझर्व्ह बँक