Join us  

गौतम अदानींच्या 'या' कंपनीच्या नव्या डीलचा फायदा; गुतंवणूकदारांना झाला जबरदस्त नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 7:16 PM

Gautam Adani Company Deal : अदानी एन्टरप्रायझेसशी (AEL) निगडीत एका वृत्तानं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. अदानींच्या कंपनीनं एका कंपनीतील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देअदानी एन्टरप्रायझेसशी (AEL) निगडीत एका वृत्तानं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. अदानींच्या कंपनीनं एका कंपनीतील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडशी (AEL) संबंधित एका वृत्तानं कंपनीच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. अदानी एंटरप्रायझेसनं दिलेल्या माहितीनुसार त्याच्या संपूर्ण मालकीची अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड (एआरटीएल) महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेडमध्ये ४९ टक्के हिस्सा घेणार आहे. महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड (MBCPNL) ही सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेडची (SIPL) उपकंपनी आहे. मात्र, या वृत्तामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. 

ट्रेडिंग दरम्यान अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरच्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास कंपनीचा शेअर १,४५० रुपयांच्या वर गेला होता. मंगळवारी सुरूवातीच्या सत्रात कंपनीचा शेअर एक टक्का वाढीसह ट्रेड होत होता. तर बाजार मूल्याबद्दल बोलायचे झाले तर ते एक लाख ६० हजार कोटींवर गेलं होतं. शेअर बाजाराच्या अखेरच्या सत्रात शेअर्सची किंमत १,४४१.३५ रूपये इतकी झाली होती. तर मार्केट कॅपिटलही १ लाख ५७ मूल्यही १ लाख ५७ हजार कोटी इतकं होतं.

गेल्या काही काळापासून Adani ग्रुप अनेकविध कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. शेअर मार्केटमधील विक्रमी घोडदौड असो वा एका वृत्तामुळे अब्जावधी रुपयांचे झालेले नुकसान असो. Adani ग्रुपबाबत विविध स्तरावर चर्चा होताना दिसत आहेत. मुंबई उपनगरातील वीजवितरण व्यवसाय, मुंबई व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता Adani ग्रुपने महाराष्ट्राच्या ६ राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांवरही ताबा मिळवला आहे.

४९ टक्के हिस्स्याची खरेदीमहाराष्ट्राच्या ६ राज्यांशी लागून असलेल्या या २४ तपासणी नाक्यांची उभारणी करून व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार असलेल्या ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’च्या कंपनीतील ४९ टक्के वाटा १६८० कोटी रुपयांना Adani ग्रुपने विकत घेतला. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किंवा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार Adani ला मिळाले आहेत. एका राज्याच्या सीमेतून दुसऱ्या राज्याच्या सीमेत प्रवेश करताना व्यापारी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना शुल्क द्यावे लागते.

महाराष्ट्राची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक, गोवा या सहा राज्यांशी जोडली आहे. त्यामुळे या सहा राज्यांच्या सीमेवर एकू ण २४ तपासणी नाके आहेत. हे तपासणी नाके उभारणे, ते चालवणे व शुल्क वसुलीचे काम ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर’ने आपल्या ‘महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि.’या कं पनीमार्फत हाती घेतले होते.

त्यापैकी १८ तपासणी नाके कार्यरत असून ४ नाक्यांचे काम जवळपास सुरू झाले आहे. एक पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात असून एकाचे बांधकाम सुरू आहे. महाराष्ट्राच्या व्यापारी वाहतुकीवरील सेवा शुल्कांचे अधिकार असलेल्या या ‘महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि.’ या कंपनीतील ४९ टक्के वाटा १६८० कोटी रुपयांना ‘अदानी रोड ट्रान्सपोर्ट लि.’ या कंपनीने विकत घेतला आहे. ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर’च्या महाराष्ट्रातील तपासणी नाक्यांच्या कंपनीवर अदानीने आता ताबा मिळवला आहे. त्यामुळे २०३३ पर्यंतचा राज्याच्या सीमेवरील २४ तपासणी नाक्यांचा ताबा व तेथील सेवा शुल्क वसुलीचा अधिकार अदानी रोड ट्रान्सपोर्टला मिळणार आहे.

टॅग्स :अदानीगुंतवणूकपैसाशेअर बाजार