Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाने बोली सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्चहून 25 मार्चपर्यंत वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 06:04 PM2022-03-13T18:04:26+5:302022-03-13T18:05:09+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाने बोली सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्चहून 25 मार्चपर्यंत वाढवली आहे.

Gautam Adani led Adani Finserve Piramal among 14 bidders for Anil Ambani led Reliance Capital | अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शियल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्यांनी अनिल अंबानींची कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाने बोली सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्चहून 25 मार्चपर्यंत वाढवली आहे. 29 नोव्हेंबर रोजी, RBI ने रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड गव्हर्नन्सच्या अभावामुळे आणि पेमेंट डिफॉल्टमुळे विसर्जित केले होते. 

सुत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स कॅपिटलला खरेदी करण्यात स्वारस्य दाखवलेल्या कंपन्यांमध्ये Arpwood, Verde Partners, Multiples Fund, Nippon Life, Jessie Flowers, Brookfield, Oaktree, Apollo Global, Blackstone आणि Hero Fincorp यांचा समावेश आहे. ही तिसरी सर्वात मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे ज्याच्या विरोधात मध्यवर्ती बँकेने अलीकडेच दिवाळखोरी अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. इतर दोन कंपन्या Srei Group NBFC आणि दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (DHFL) आहेत. 

संपूर्ण कंपनीसाठी बोली लावली
काही संभाव्य बोलीदारांच्या विनंतीनुसार, ज्यांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) दाखल करण्यासाठी आणखी काही वेळ मागितला होता, त्यांच्या विनंतीवरून बोली सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. बहुतांश निविदाधारकांनी संपूर्ण कंपनीसाठी बोली लावल्याचे सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय यांची या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, आरबीआय-नियुक्त प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलकडून स्वारस्य व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले होते.

बोलीदारांकडे दोन पर्याय
बोलीदारांकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण कंपनीसाठी (रिलायन्स कॅपिटल लिमिटेड) बोली लावणे. रिलायन्स कॅपिटल अंतर्गत एकूण आठ उपकंपन्या येतात. बोलीदार यापैकी एक किंवा अधिक कंपन्यांसाठी देखील बोली लावू शकतात. रिलायन्स कॅपिटलच्या उपकंपन्यांबद्दल बोलायचे तर त्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स अॅसेट री-कन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांचा समावेश आहे.

कंपनीवर 40 हजार कोटींचे कर्ज
सप्टेंबर 2021 मध्ये, रिलायन्स कॅपिटलने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले होते की कंपनीवरील एकूण कर्ज 40 हजार कोटी आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा 1759 कोटी रुपयांवर आला होता. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत कंपनीचा एकूण तोटा 3966 कोटी रुपये होता. रिलायन्स कॅपिटलची स्थापना 1986 मध्ये झाली होती.

Web Title: Gautam Adani led Adani Finserve Piramal among 14 bidders for Anil Ambani led Reliance Capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.