Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट

Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट

Gautam Adani Paytm : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन (Adani-Paytm Deal) मधील हिस्सा खरेदी करण्याचा अदानी समूह विचार करत असून बोलणी सुरू असल्याचं वृत्त समोर आलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:32 AM2024-05-29T10:32:13+5:302024-05-29T10:32:13+5:30

Gautam Adani Paytm : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन (Adani-Paytm Deal) मधील हिस्सा खरेदी करण्याचा अदानी समूह विचार करत असून बोलणी सुरू असल्याचं वृत्त समोर आलंय.

Gautam Adani likely in talks with Vijay Shekhar Sharma to acquire stake in Paytm one97 communication | Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट

Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट

Gautam Adani Paytm : जगातील आघाडीच्या अब्जाधीशांपैकी एक असलेले गौतम अदानी (Gautam Adani) आपला व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि आता त्यांची नजर भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) निर्बंध घातलेल्या फिनटेक फर्म पेटीएमवर (Paytm) असल्याचं म्हटलं जातंय. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन (Adani-Paytm Deal) मधील हिस्सा खरेदी करण्याचा अदानी समूह विचार करत असून बोलणी सुरू असल्याचं वृत्त समोर आलंय.
 

अदानी-शर्मांची अहमदाबादमध्ये भेट
 

काही दिवसांपूर्वीच पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) रिझर्व्ह बँकेनं कारवाई (RBI Action On Paytm) केली होती. यामुळे पेटीएमला मोठा झटका बसला आणि तिमाहीमध्येही मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. या सर्व घटनाक्रमानंतर आता गौतम अदानी समूहाद्वारे पेटीएमच्या पॅरेंट कंपनीत हिस्सा खरेदी करण्याचं वृत्त मसोर आलं आहे. 
 

विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील कंपनीला मार्च तिमाहीत ५४९.६० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, जो डिसेंबर तिमाहीत २१९.८० कोटी रुपये आणि मागील वर्षी याच तिमाहीत १६८.९० कोटी रुपये होता.
 

फिनटेक क्षेत्रात एन्ट्रीच्या तयारीत
 

बिझनेस टुडेने अदानी-पेटीएमच्या संस्थापकांची भेट आणि करारावरील चर्चेच्या या वृत्ताला स्वतंत्रपणे दुजोरा दिला नसला, तरी हा करार पूर्ण झाल्यास बंदरांपासून विमानतळांपर्यंतच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या अदानी समूहाला फिनटेक क्षेत्रात प्रवेश करण्यास मदत होईल. यापूर्वी अदानी समूहानं आपला व्यवसाय वाढवत एसीसी आणि अंबुजा सिमेंट या सिमेंट कंपन्यांचं अधिग्रहण केलं होतं आणि गेल्या आर्थिक वर्षात मीडिया फर्म एनडीटीव्हीलाही आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलं.
 

शर्मा यांचा पेटीएममध्ये १९% हिस्सा
 

रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईनंतर हे फिनटेक फर्म संकटात सापडलं आहे. यादरम्यान, सॉफ्टबँकेनं पेटीएममधील आपला हिस्सा विकला होता. याशिवाय वॉरन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेही गेल्या वर्षी पेटीएममधून बाहेर पडली. अन्य एका रिपोर्टनुसार अदानी समूह पेटीएमची पॅरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशनमध्ये  (One97 Communications) इनव्हेस्टर्सच्या रुपात येण्यासाठी पश्चिम आशियाई फंडांशीही सपर्कात आहे. विजय शेखर शर्मा यांच्याकडे पेटीएममध्ये जवळपास १९ टक्के हिस्सा आहे.

Web Title: Gautam Adani likely in talks with Vijay Shekhar Sharma to acquire stake in Paytm one97 communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.