नवी दिल्ली – अदानी ग्रुप(Adani Group) च्या शेअर्सचे दर बुधवारी मोठ्या प्रमाणात कोसळले. त्यामुळे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी(Gautam Adani) यांच्या संपत्तीत एका दिवसात ३.०३ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास २२, ५४३ कोटी रुपयांची घट झाली आहे. Bloomberg Billioneres Index नुसार अडानी श्रीमंताच्या यादीतून ५ व्या स्थानावरून घसरून थेट २१ व्या स्थानावर आले आहेत.
अदानी यांची उलाढाल ५९.३ अब्ज डॉलर्स आहेत, यावर्षी त्यांच्या आर्थिक उलाढालीत २५.५ अब्ज डॉलर्स वाढले आहेत, जे दुसऱ्या श्रीमंत व्यक्तींपेक्षा अधिक आहेत. या यादीत मुकेश अंबानी ७५.९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १२ व्या स्थानावर कायम आहेत. ते आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. Bloomberg Billionaires Index च्या नुसार अमेझोनचे जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती १९२ अब्ज डॉलर्स आहे. त्यानंतर ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क हे १७३ अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकेचा दबदबा
या यादीत मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर बिल गेट्स १४३ अब्ज डॉलर्स तिसऱ्या नंबरवर आहेत. बिझनेसमॅन आणि जगातील सर्वात मोठी लग्जरी गुड्स कंपनीचे चेअरमन बर्नार्ड आरनॉल्ट १२८ अब्ज डॉलर्स संपत्ती असून ते यादीत चौथ्या स्थानावर आहेत. अमेरिकन मीडियाचे दिग्गज आणि फेसबुक सीईओ मार्क जुकेरबर्ग ११८ अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक आहेत. ते यादीत ५ व्या स्थानी आहेत.
अमेरिकन कॅम्प्यूटर साइंटिस्ट लैरी पेज १०२ अब्ज डॉलर्ससह ६ व्या स्थानावर आहेत, तर गुंतवणूकदार वारेन बफे ९९.७ अब्ज डॉलर्स संपत्तीसह ७ व्या स्थानावर, गुगलचे फाऊंडर सर्गेई ब्रिन ९८.९ अब्ज डॉलर्ससह ८ व्या स्थानावर आहेत जगातील १० श्रीमंतांपैकी ९ अमेरिकेचे आहेत.