अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेसने जपानमधील एका कॉर्पोरेट घराण्यासोबत हात मिळवला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या एका उपकंपनीने ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजनच्या मार्केटिंगसाठी जपानमधील कॉर्पोरेट घराणे कोवा ग्रुपसोबत जॉइंट व्हेंचर स्थापन करण्यासाठी भागीदारी केली आहे.
अदानी एंटरप्रायझेसची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी अदानी ग्लोबल पीटीई लिमिटेड, सिंगापूरने 8 सप्टेंबरला कोवा होल्डिंग्स एशिया पीटीई लिमिटेड (सिंगापूर) सोबत जॉइंट व्हेंचर करारावर स्वाक्षरी केली आहे. जॉइंट व्हेंचरमध्ये अदानी आणि कोवाची 50-50 टक्के वाटा असेल.
मात्र, अद्याप या करारासंदर्भात समूहाकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही. अदानी समूह पाण्यापासून ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्याची सुविधा निर्माण करण्यासाटी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत आहे.
मार्केट कॅप 11 लाख कोटी -
यातच, अदानी समूहाचे एकूण मार्केट कॅप शुक्रवारी 11 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहे. जे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, अशा दोन्ही गुंतवणूकदारांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या खरेदीमुळेच शक्य होऊ शकते.