Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा-बिर्लाशी स्पर्धा; आता गौतम अदानी 'या' क्षेत्रात करणार धमाकेदार एंट्री!

टाटा-बिर्लाशी स्पर्धा; आता गौतम अदानी 'या' क्षेत्रात करणार धमाकेदार एंट्री!

Adani Enterprises : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह (Adani Group) एकामागून एक नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 08:30 PM2022-08-11T20:30:41+5:302022-08-11T20:31:50+5:30

Adani Enterprises : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह (Adani Group) एकामागून एक नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे.

gautam adani new plan invest more than 5 billion dollar to set up alumina refinery | टाटा-बिर्लाशी स्पर्धा; आता गौतम अदानी 'या' क्षेत्रात करणार धमाकेदार एंट्री!

टाटा-बिर्लाशी स्पर्धा; आता गौतम अदानी 'या' क्षेत्रात करणार धमाकेदार एंट्री!

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी आपला व्यवसाय सातत्याने वाढवत आहेत. अलीकडेच सिमेंट व्यवसायात प्रवेश केल्यानंतर अदानी आता मेटल क्षेत्रात धमाकेदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या अंतर्गत त्यांची समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) ओरिसामध्ये अॅल्युमिना रिफायनरी  (Alumina Refinery) प्लांट उभारण्याच्या तयारीत आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह (Adani Group) एकामागून एक नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) सरकारने प्लांट उभारण्यास मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अदानी एंटरप्रायझेसकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

रिपोर्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील माहितीचा हवाला देत म्हटले आहे की, रायगडा जिल्ह्यात ही रिफायनरी उभारण्यासाठी अदानी समूहाला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, या प्रकल्पातील गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाल्यास अदानी कंपनी 5.2 अब्ज डॉलर (41 हजार कोटींहून अधिक) गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. या अॅल्युमिना रिफायनरीची (Alumina Refinery) एकूण क्षमता 40 लाख टन असणार आहे. 

अब्जाधीश भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी डिसेंबर 2021 मध्ये मुंद्रा अॅल्युमिनियम लिमिटेड (Mundra Aluminium Limited)  कंपनी स्थापन केली होती. जी या क्षेत्रातील आपल्या तयारीचे मोठे संकेत होते. अदानी यांच्या कंपनीने अॅल्युमिनिअम क्षेत्रात प्रवेश केल्याने या क्षेत्रात आधीच अस्तित्वात असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांनासोबत मोठी स्पर्धा होईल. यामध्ये टाटा समूहासह आदित्य बिर्ला समूह आणि लंडनच्या वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचा समावेश आहे.

जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती
अॅल्युमिनाला अॅल्युमिनियम ऑक्साइड असेही म्हणतात. हे खरंतर अॅल्युमिनियम आणि ऑक्सिजनचे रासायनिक संयुग आहे. विशेष म्हणजे गौतम अदानी वेगाने आपला व्यवसाय वाढवत आहेत. जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत, त्यांचा दर्जा आणि दबदबाही वाढत आहे. सध्या 129.8 अब्ज डॉलर संपत्तीसह अदानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 2022 मध्ये ते सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश देखील आहेत.

Web Title: gautam adani new plan invest more than 5 billion dollar to set up alumina refinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.