Join us

अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ, स्वस्त शेअरनं पकडला रॉकेट स्पीड, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 3:00 PM

अदानींच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे.

Adani Power Share: अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांनी वाढून 389.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर, अदानी पॉवरचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत.

कामकाजाच्या गेल्या सात दिवसांमध्ये कंपनीचा शेअर 25 टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत 66.03 टक्क्यांनी वाढला आहे. विविध व्यवसायांशी निगडित अदानी समूहाची ऊर्जा कंपनी अदानी पॉवरचा एकात्मिक निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ९ पटीनं वाढून 6,594 कोटी रुपयांवर पोहोचला.चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अदानी पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा 848 टक्क्यांनी वाढून 6,594 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी, 2022-23 च्या जुलै-सप्टेंबर याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 696 कोटी रुपये होता, असं कंपनीनं म्हटलं आहे.करापूर्वीच्या उत्पन्नातही सुधारणा झाली आहे. कंपनीचं एकत्रित उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत 61 टक्क्यांनी वाढून 12,155 कोची रुपये झालं. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचं एकत्रित उत्पन्न 7534 कोटी रुपये होतं. वीजेची विक्री वाढल्यानं उत्पन्न वाढल्याचं अदानी पॉवरनं म्हटलंय. कंपनीची स्थापित थर्मल पॉवर क्षमता 15,210 मेगावॅट आहे. कंपनीचे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि झारखंडमध्ये वीज प्रकल्प आहेत.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय