नुकतीचं सेबीने मीडिया हाऊस एनडीटीव्हीमध्ये ओपन ऑफरद्वारे हिस्सा खरेदी करण्यास अदानी समुहाला मंजुरी दिली. अदानींचे (Gautam Adani) नाव जोडताच NDTV च्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. सलग तिसर्या दिवशी एनडीटीव्हीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं. गुरुवारी कामकाजादरम्यान एनडीटीव्हीचा शेअर 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह NSE वर 422.25 रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सेबीने मीडिया हाऊस एनडीटीव्हीमध्ये ओपन ऑफरद्वारे हिस्सा खरेदी करण्यास अदानी समुहाला मंजुरी दिली. याची सुरुवात 22 नोव्हेंबरला होईल आणि 5 डिसेंबरला बंद होईल. यापूर्वी ओपन ऑफर 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत चालवण्याचा प्रस्ताव होता. परंतु नंतर त्याची डेडलाईन 22 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. जेव्हापासून एनडीटीव्ही अदानी समुहाद्वारे खरेदी केला जाणार आहे याचं वृत्त समोर आलं होतं तेव्हापासूनच शेअरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली होती.
ओपन ऑफर म्हणजे काय?ओपन ऑफर कोणत्याही कंपनीच्या अधिग्रहणाचा एक पारदर्शी आणि वैध प्रकार मानला जातो. ओपन ऑफरमध्ये विक्री होणाऱ्या कंपनीच्या निर्धारित शेअरधारकांना एका निश्चित किंमतीवर शेअर विकण्याचा प्रस्ताव दिला जातो. या अंतर्गत अधिग्रहण करणारी कंपनी आपली डील त्या फर्मच्या शेअरधारकांना सामील करते.