Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंतराळातूनही दिसणार Gautam Adani यांचं नवं एनर्जी पार्क, गुजरातमध्ये करणार २ लाख कोटींची गुंतवणूक

अंतराळातूनही दिसणार Gautam Adani यांचं नवं एनर्जी पार्क, गुजरातमध्ये करणार २ लाख कोटींची गुंतवणूक

या गुंतवणूकीमुळे १ लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये सांगितलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 01:04 PM2024-01-10T13:04:22+5:302024-01-10T13:05:14+5:30

या गुंतवणूकीमुळे १ लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये सांगितलं.

Gautam Adani s new energy park visible from space will invest 2 lakh crores in Gujarat 1 lakhs jobs vibrant Gujrat summit | अंतराळातूनही दिसणार Gautam Adani यांचं नवं एनर्जी पार्क, गुजरातमध्ये करणार २ लाख कोटींची गुंतवणूक

अंतराळातूनही दिसणार Gautam Adani यांचं नवं एनर्जी पार्क, गुजरातमध्ये करणार २ लाख कोटींची गुंतवणूक

Vibrant Gujarat Global Summit: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी गुजरातमध्ये २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली आहे. अंतराळातूही दिसणारं असं विशाल एनर्जी पार्क उभारलं जाईल, असं अदानी यांनी नमूद केलं. बुधवार, १० जानेवारी रोजी अहमदाबाद येथे आयोजित 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये गौतम अदानी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या गुंतवणुकीमुळे राज्यात एक लाख रोजगार निर्माण होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अदानी समूहानं गेल्या वर्षीच्या शिखर परिषदेत राज्यात ५५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यापैकी ५०,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असल्याची माहिती गौतम अदानी यांनी दिली. "अदानी समूह आता कच्छमध्ये २५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या २० गीगाव्हॅट क्षमतेचा ग्रीन एनर्जी पार्क बनवत आहे, तो अंतराळातूनही दिसले," असं त्यांनी यावेळी सांगितलं.

'२०१४ पासून जीडीपी वाढला'

"२०१४ पासून भारताचा जीडीपी (GDP) १८५ टक्के आणि दरडोई उत्पन्न १६५ टक्क्यांनी वाढले आहे. सर्व भू-राजकीय आणि जागतिक महासाथी संबंधित आव्हानांचा विचार करता हे उल्लेखनीय आहे," असं अदानी म्हणाले.

"आम्ही आत्मनिर्भर भारतासाठी ग्रीन सप्लाय चेनचा विस्तार करत आहोत आणि सर्वात मोठी इंटिग्रेटेड रिन्युएबल एनर्जी सप्लाय इकोसिस्टम निर्माण करत आहोत. यामध्ये सोलार पॅनेल, विंड टर्बाइन, हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स, ग्रीन अमोनिया, पीव्हीसी तसंच कॉपर आणि सीमेंटच्या उत्पादनातील विस्ताराचा समावेश आहे," असं त्यांनी नमूद केलं.

Web Title: Gautam Adani s new energy park visible from space will invest 2 lakh crores in Gujarat 1 lakhs jobs vibrant Gujrat summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.