भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना 31 मार्च, 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण 9.26 कोटी रुपये एवढी सॅलरी मिळाली आहे. ही सॅलरी त्यांच्या समकक्ष लोकांच्या तुलनेत बरीच कमी आहे. अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांच्या वार्षिक अहवालानुसार, अदानी यांनी बंदरे ते ऊर्जा क्षेत्रापर्यंत कार्यरत असलेल्या 10 कंपन्यांपैकी केवळ दोन कंपन्यांकडूनच सॅलरी अथवा वेतन घेतले आहे.
अदानी यांनी २०२३-२४ मध्ये समूहातील मुख्य कंपनी म्हणजेच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कडून सॅलरीच्या स्वरुपात 2.19 कोटी रुपये आणि लाभ तसेच इतर भत्त्यांच्या स्वरुपात 27 लाख रुपये मिळवले आहेत. एईएलच्या वार्षिक अहवालानुसार, 2.46 कोटी रुपये हे त्यांचे एकूण वेतन गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तीन पट अधिक आहे. याशिवाय अदानी यांना अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडकडून (APSEZ) 6.8 कोटी रुपये एवढे वेतन मिळाले आहे.
इतरांच्या तुलनेत अदानी यांचे वेतन बरेच कमी -
खरे तर, अदानी यांचे वेतन भारतातील जवळपास सर्वच मोठ्या कुटुंबांची मालकी असलेल्या समूहांच्या प्रमुखांच्या तुलनेत कमी आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी कोरोनानंतर वेतन घेणे बंद केले आहे. ते कुठलेही वेतन घेत नाहीत. यापूर्वी त्यांचे वार्षिक वेतन 15 कोटी रुपयांपर्यंत होते. अदानी यांचे वेतन अथवा सॅलरी दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल (2022-23 में 16.7 कोटी रुपये), राजीव बजाज (53.7 कोटी रुपये), पवन मुंजाळ (80 कोटी रुपये), एलअँडटीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यम आणि इन्फोसिसचे सीईओ सलिल एस पारेख यांच्या तुलनेत बरेच कमी आहे.