Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी

Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी

Gautam Adani: जगातील कोणत्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही, असे अदानी म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:20 PM2021-07-12T15:20:09+5:302021-07-12T15:23:02+5:30

Gautam Adani: जगातील कोणत्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही, असे अदानी म्हणाले.

gautam adani says one in every four flyers in India uses an Adani airport | Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी

Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी

Highlightsदेशातील प्रत्येक चार प्रवाशांपैकी एक प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतोअदानी कंपनीकडे एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सासंपूर्ण भारतात विमानतळाचे जाळे उभारणार - गौतम अदानी

नवी दिल्ली:अदानी समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी कंपनीची वाटचाल, ध्येयधोरणे, अचिव्हमेंट्स याबाबत भागधारक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यावेळी बोलताना देशातील प्रत्येक चार प्रवाशांपैकी एक प्रवासी अदानी विमानतळाचा वापर करत प्रवास आणि उड्डाण करतो. जगातील कोणत्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही. अदानी एन्टरप्राइजेस या कंपनीमार्फत समूहाने विमानतळ विकास या क्षेत्रात पाउल ठेवल्याचे अदानी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (gautam adani says one in every four flyers in India uses an Adani airport)

अदानी समूहाने अलीकडेच अहमदाबाद, लखनौ आणि मंगलोर विमानतळांवरील कामकाज सुरू केले असून, गुवाहाटी, जयपूर आणि तिरुअनंतपुरम या विमानतळांसाठी सवलत करारांवर सह्या केलेल्या आहेत. तसेच कंपनीकडून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे गौतम अदानी यांनी म्हटले आहे. 

४७ बोगदे, १२१ ब्रीज आणि तिबेटचा दुर्गम भाग; चीनने ‘अशी’ सुरु केली बुलेट ट्रेन

संपूर्ण भारतात विमानतळाचे जाळे उभारणार 

कंपनीकडून संपूर्ण भारतभर विमानतळाचे जाळे उभारण्याबरोबरच, प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्प्नशिवाय इतर स्रोतातून उत्त्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधून निर्माण होणाऱ्या शक्यता सुद्धा कंपनीकडून तपासून पहिल्या जात आहेत, असे गौतम अदानी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. दुसरीकडे, काही आठवड्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने नवी मुंबई विमानतळाचे जीव्हीकी एअरपोर्ट डेव्हलपर लिमिटेड या कंपनीकडे असणारे ५०.५ टक्के समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडला देण्यास परवानगी दिली. मलाकी हक्कातील बदलांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यत देण्यात आल्याने नवी मुंबई विमानतळाचा कारभारही अदानी समुहाकडेच असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

गरिबीमुळे महिला, चिमुकल्यांवर शेत नांगरणीची वेळ; मध्य प्रदेशातील भयाण वास्तव समोर

दरम्यान, अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या समभागांनी १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला. जवळपास ९ हजार ५०० कोटी रुपयाचा परतावा समभागधारकांना देण्यात आला. कंपन्यांचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६६ टक्क्यांनी वाढल्याचे गौतम अदानी यांनी सांगितले. आताच्या घडीला अदानी समूह बंदर, विमानतळ, लॉजिस्टिक, नैसर्गिक संसाधने, औष्णिक आणि अपारंपरिक वीज उत्पादन, पारेषण, वितरण, डेटा सेंटर, संरक्षण, बांधकाम, शहरी वायू वितरण आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. 
 

Web Title: gautam adani says one in every four flyers in India uses an Adani airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.