Adani Group Stocks: उद्योगपती गौतम अदानी, यांचा अदानी समूह (Adani Group) शुक्रवार(23 ऑगस्ट 2024) रोजी अंबुजा सिमेंटमधील (Ambuja Cement) आपला हिस्सा विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवर्तक समूह अंबुजा सिमेंटमधील आपला 2.84 टक्के हिस्सा विकून 4200 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.
अदानी समूहाची संस्था एंटिटी होल्डरइंड इन्व्हेस्टमेंट्स(Holderind Investments) एका ब्लॉक डीलद्वारे अंबुजा सिमेंटचे 69.96 मिलियन्स शेअर्स विकण्याची तयारी करत आहे यासाटी फ्लोअर प्राईस 600 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर गुरुवारच्या 632 रुपये प्रति शेअरच्या किमतीपासून 5 टक्के सवलतीवर दिला जाणार आहे. जेफरीज या ब्लॉक डीलचे सल्लागार आहेत.
दरम्यान, अंबुजा सिमेंटचे मार्केट कॅप 1.56 लाख कोटी रुपये आहे. सध्या अदानी समुहाचा यात 70.33 टक्के हिस्सा आहे, ज्यामध्ये होल्डरिंड इन्व्हेस्टमेंट्सचा 50.90 टक्के वाटा आहे. 2022 मध्ये अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि ACC खरेदी केली होती. अदानी समूहाची अदानी सिमेंट ही देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी असून, त्यात अंबुजा सिमेंट, एसीसी आणि संघी इंडस्ट्रीजचा समावेश आहे.
यावर्षी जून महिन्यात अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड खरेदी करण्याची घोषणा केली आहे. अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंटमधील 100 टक्के हिस्सा 10422 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. या संपादनामुळे, अंबुजा सिमेंटची वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता 14 मिलियन टनांनी वाढून वार्षिक 89 दशलक्ष टन झाली आहे.
शेअर्सची स्थितीहिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. 30 जानेवारी 2023 रोजी स्टॉक 380 रुपयांपर्यंत घसरला होता. पण या स्तरावरून समभागाने जोरदार पुनरागमन केले आहे. या घसरणीमुळे शेअरमध्ये 86 टक्क्यांची उसळी आली आणि शेअर 706 रुपयांवर पोहोचला. अंबुजा सिमेंटचे शेअर्स 2024 मध्ये 16 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.