Join us  

Gautam Adani Vs Mukesh Ambani Networth : रॉकेट स्पीडनं वाढतेय गौतम अदानींची संपत्ती, कमाईच्या बाबतीत प्रचंड मागे पडले मुकेश अंबानी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 2:43 PM

टेस्ला आणि स्पेसएक्सचेचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 260 अब्ज डॉलर एवढी आहे...

कमाईच्या बाबतीत गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना प्रचंड मागे टाकले आहे. आता गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनीअर्स (Bloomberg Billionaires Index)च्या इंडेक्सनुसार, 59 वर्षीय अदानी यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर एवढी झाली आहे, तर अंबानींची संपत्ती 97.5 अब्ज डॉलर एढी आहे. ब्लूमबर्ग बिलियनीअर्स इंडेक्सनुसार, गेल्या एका दिवसात अदानी यांच्या संपत्तीत 3.90 अब्ज डॉलरची वाढ झाली, तर अंबानींची संपत्ती केवळ 1.54 अब्ज डॉलरने वाढली आहे. (Gautam Adani Vs Mukesh Ambani networth)

क्रमांक एकवर इलॉन मस्क -टेस्ला आणि स्पेसएक्सचेचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इलॉन मस्क यांची संपत्ती 260 अब्ज डॉलर आहे. यानंतर अॅमेझॉनचे जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती 179 अब्ज डॉलर एवढी आहे. तिसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अरनॉल्ट, चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स, पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे, सहाव्या क्रमांकावर लॅरी पेज आणि सातव्या क्रमांकावर Sergey Brin हे आहेत.

2022 मध्ये अदानी यांची संपत्ती 33.0 अब्ज डॉलर्सनी वाढली - ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, या वर्षी 2022 मध्ये, गौतम अदानी यांच्या संपत्तीत 33.0 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 7.50 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या यादीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानींनंतर वॉरेन बफे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बफे यांच्या संपत्तीत 18.7 अब्ज डॉलरची वाढ झाली. Guillaume Pousaz या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्या संपत्तीत यावर्षी 11.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 

टॅग्स :अदानीमुकेश अंबानीव्यवसाय