Join us

गौतम अदानींच्या यशामागे आहे मुंबईतलं 'हे' कॉलेज; प्रवेश नाकारल्याने उतरले व्यवसायात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 3:47 PM

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी मुंबईतल्या एका महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आले होते.

Gautam Adani : जगप्रसिद्ध उद्योगपती गौतन अदानी यांच्याबद्दल अनेक किस्से  आपण ऐकले असतील. पण आता त्यांच्या कॉलेज प्रवेशासंदर्भातील एक किस्सा आहे ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्योगपती गौतन अदानी १९७० च्या दशकात शिक्षणासाठी मुंबईच्या एका महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र महाविद्यालयाने अदानी यांचा अर्ज नाकारला होता. त्यानंतर गौतम अदानी यांनी पुढचे शिक्षण घेतलं नाही आणि व्यवसायत उतरण्याचं ठरवलं. त्यानंतर अदानी यांनी व्यवसायात असा जम बसवला की चार दशकांमध्येच त्यांनी २०० अब्ज डॉलरचे स्रामाज्य उभं करुन टाकलं. गुरुवारी शिक्षक दिनाच्यानिमित्ताने गौतम अदानी यांना त्याच महाविद्यालयाने त्यांना व्याख्यान देण्यासाठी बोलवलं होतं.

शिक्षक दिनाच्यानिमित्ताने गौतम अदानी मुंबईतल्या जय हिंद या महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आले होते. यावेळी जय हिंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विक्रम नानकानी यांनी गौतम अदानी यांची ओळख करून दिली. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विक्रम नानकानी यांनी गौतम अदानी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, ते वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईत आले होते. गौतम अदानी यांनी १९७७ किंवा १९७८ मध्ये जय हिंद महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केला. मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यांचा मोठा भाऊ विनोद याच महाविद्यालयात शिकला होता.

गौतम अदानी यांच्या व्याख्यानानंतर नानकानी यांनी सांगितले की, गौतम अदानी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. मात्र, सुदैवाने किंवा दुर्दैवाने महाविद्यालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला नाही आणि त्यांनी स्वत: व्यवसाय सुरू केला आणि तेच पर्यायी करिअर म्हणून स्वीकारले. दोन वर्षे मुंबईत डायमंड सॉर्टर म्हणून काम केले आणि त्यानंतर ते गुजरातला गेला.

गौतम अदानी यांनी १९९८ मध्ये त्यांच्या व्यापार सुरू केला. पुढील अडीच वर्षात त्यांच्या कंपन्यांनी बंदरे, खाणी, पायाभूत सुविधा, वीज, शहर वायू, अक्षय ऊर्जा, सिमेंट आणि डेटा सेंटर्स यांसारख्या क्षेत्रात प्रवेश केला आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठं यश संपादन केले.

'ब्रेकिंग बाउंडरीज: द पॉवर ऑफ पॅशन अनकन्वेंशनल पाथ टू सक्सेस' या विषयावर गौतम अदानी यांनी व्याख्यान दिलं. "व्यवसायाचे क्षेत्र तुम्हाला एक चांगला शिक्षक बनवते. मी खूप पूर्वी शिकलो होतो की एखादा उद्योजक त्याच्यासमोरील पर्यायांचे मूल्यांकन करून कधीही स्थिर राहू शकत नाही. या मुंबईनेच मला मोठा विचार करायला शिकवले. आधी तुम्ही तुमच्या मर्यादेपलीकडे स्वप्न पाहण्याचे धाडस केले पाहिजे. मी २३ वर्षांचा झालो तोपर्यंत माझा व्यवसाय चांगला चालला होता. १९९१ च्या उदारीकरणानंतर पॉलिमर, धातू, कापड आणि कृषी-उत्पादने यांचा व्यवसाय करणाऱ्या जागतिक व्यावसायिक घराची स्थापना केली. दोन वर्षांत, आम्ही देशातील सर्वात मोठे जागतिक व्यावसायिक घराणे बनलो. तेव्हाच मला वेग आणि स्केल या दोन्हींचे एकत्रित मूल्य समजले. मग, १९९४ मध्ये, आम्ही सार्वजनिक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि अदानी एक्सपोर्ट्स, ज्याला आता अदानी एंटरप्रायझेस म्हणून ओळखले जाते, त्याचा आयपीओ लाँच केला," असं गौतम अदानी यांनी म्हटलं.

टॅग्स :गौतम अदानीमुंबईव्यवसाय