Lokmat Money > बिझनेस न्यूज > गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान

गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान

World Second Richest Person: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून, पहिल्या क्रमांकावर इलॉन मस्क कायम आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 03:31 PM2022-09-16T15:31:47+5:302022-09-16T16:20:14+5:30

World Second Richest Person: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून, पहिल्या क्रमांकावर इलॉन मस्क कायम आहेत.

Gautam Adani World Richest Person: Gautam Adani Became the second richest person in the world, overtaking Jeff Bezos | गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान

गौतम अदानी सूसाट..! जेफ बेझोस यांना मागे टाकत पटकावले दुसरे स्थान

World Richest List: अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस आणि लुईस फायनान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकत भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी यांची संपत्ती US$ 154.7 अब्ज इतकी झाली आहे. 

इलॉन मस्क अव्वल
टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क अजूनही US$ 273.5 अब्ज संपत्तीसह या यादीत अव्वल स्थानावर आहेत. गेल्या महिन्यात गौतम अदानी यांनी लुईस फ्युटनच्या बर्नार्ड अर्नॉल्ट कुटुंबाला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले होते, परंतु त्यावेळी ते जेफ बेझोस आणि एलोन मस्क यांच्या मागे होते.

मुकेश अंबानी कितव्या स्थानावर?
आता अर्नॉल्ट कुटुंब USD 153.5 बिलियन संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. शुक्रवारी त्यांची एकूण संपत्ती 3.08 टक्के किंवा USD 4.9 अब्ज इतकी घसरली. दुसरीकडे, जेफ बेझोस $ 149.7 अब्जच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आले आहेत. त्यांची संपत्ती शुक्रवारी US$ 2.3 अब्जाने घसरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख मुकेश अंबानी या यादीत 92 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या स्थानावर आहेत. 

अदानी समूहाची व्याप्ती
गौतम अदानी यांनी मेहनतीच्या जोरावर हे स्थापन पटकावले आहे. आज अदानी समुह पायाभूत सुविधा, खाणकाम, उर्जा आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग सार्वजनिक भागीदारीतून येतो. अदानी इंटरप्राइजेज, अदानी पॉवर आणि अदानी ट्रांसमिशनमध्ये 75 टक्के वाटा आहे. तर, टोटल गैसचा सूमारे 37 टक्के, अदानी पोर्ट्सचा 65 टक्के आणि ग्रीन एनर्जीचा 61 टक्के वाटा गौतम अदानी यांच्याकडे आहे.

Web Title: Gautam Adani World Richest Person: Gautam Adani Became the second richest person in the world, overtaking Jeff Bezos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.