Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gautam Adani: मोदींचे दोन अब्जाधीश मित्र भिडणार! गौतम अदानींची रणशिंग फुंकले; मुकेश अंबानींनी सुरुवात केलेली

Gautam Adani: मोदींचे दोन अब्जाधीश मित्र भिडणार! गौतम अदानींची रणशिंग फुंकले; मुकेश अंबानींनी सुरुवात केलेली

Narendra Modi's two billionaire friends will clash in Petrochemicals and Solar business: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला दिलेल्या माहितीनुसार अदानी एन्टरप्रायझेसने शुक्रवारी उपकंपनी बनविली आहे. APL ने अद्याप कामकाज सुरु केलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:45 PM2021-08-01T17:45:13+5:302021-08-01T17:48:54+5:30

Narendra Modi's two billionaire friends will clash in Petrochemicals and Solar business: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला दिलेल्या माहितीनुसार अदानी एन्टरप्रायझेसने शुक्रवारी उपकंपनी बनविली आहे. APL ने अद्याप कामकाज सुरु केलेले नाही.

Gautam Adani:Gautam Adani incorporates new petrochemicals subsidiary; Will fight Mukesh Ambani's Reliance | Gautam Adani: मोदींचे दोन अब्जाधीश मित्र भिडणार! गौतम अदानींची रणशिंग फुंकले; मुकेश अंबानींनी सुरुवात केलेली

Gautam Adani: मोदींचे दोन अब्जाधीश मित्र भिडणार! गौतम अदानींची रणशिंग फुंकले; मुकेश अंबानींनी सुरुवात केलेली

Gautam Adani News: नवी दिल्ली : अदानी एन्टरप्रायझेसने अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (APL) नावाने संपूर्ण मालकी असलेली नवीन कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी  APL रिफायनरी, पेट्रोकेमिकल कॉन्प्लेक्स आणि स्पेशालिटी केमिकल्स युनिट लावणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) खास मानले जाणारे गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) एकमेकांसोर उभे ठाकणार आहेत. मुकेश अंबानींची रिलायन्सची पेट्रोकेमिकलमध्ये एकहाती सत्ता होती. (Adani Group to enter petrochemicals business, sets up Adani Petrochemicals)

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना आणखी मालामाल करणार हा नवा उद्योग; अमेरिकन फर्मची भविष्यवाणी

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला दिलेल्या माहितीनुसार अदानी एन्टरप्रायझेसने शुक्रवारी उपकंपनी बनविली आहे. APL ने अद्याप कामकाज सुरु केलेले नाही. अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (APL) भारतात रजिस्टर करण्यात आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये 30 जुलै 2021 रजिस्टर करण्यात आली आहे. अदानी पेट्रोकेमिकल लिमिटेड ऑथराइज्ड आणि पेड अप शेयर कॅपिटल ₹1,00,000 आहे. 

भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी जूनमध्ये सोलार पावर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हात आजमावण्याची घोषणा केली होती. आजवर पेट्रोकेमिकल उद्योग करणारे मुकेश अंबानी क्लीन एनर्जीवर फोकस करत आहेत. यासाठी सोलार पावरच्या क्षेत्रात 10 अब्ज डॉलर गुंतविणार आहेत. या व्यवसायात अदानी ग्रुप (Adani Group) आधीपासूनच आहे. यामुळे रिलायन्सला पेट्रोकेमिकल उद्योगात घेरण्याची रणनिती अदानींनी अवलंबली आहे. 

मुकेश अंबानींची योजना काय...
रिलायंस इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यात झालेल्या वार्षिक सभेत ग्रीन एनर्जी उद्योग सुरु करण्याची घोषणा केली. यामध्ये रिलायन्स 75 हजार कोटी रुपये गुंतविणार आहे. यापैकी 60 हजार कोटी रुपये हे 4 गीगा फॅक्टरी उभारण्य़ासाठी लागणार आहेत. या फॅक्टरीमध्ये सोलर, बॅटरी, फ्युअल सेल आणि इलेक्ट्रोलायझरचे उत्पादन केले जाणार आहे. या सर्व फॅक्टरी गुजरातच्या जामनगरमध्ये उभारण्यात येणार आहेत. 2030 पर्यंत 100 गीगावॅट सोलार एनर्जी तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 

Web Title: Gautam Adani:Gautam Adani incorporates new petrochemicals subsidiary; Will fight Mukesh Ambani's Reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.