Lokmat Money > बिझनेस न्यूज > गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात

गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात

यापूर्वी, महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. कंपनीने पीएनजीचे दर चार रुपये प्रती घनमीटर एवढे कमी करून  48.50 रुपये केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:11 AM2022-08-19T01:11:01+5:302022-08-19T01:15:41+5:30

यापूर्वी, महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. कंपनीने पीएनजीचे दर चार रुपये प्रती घनमीटर एवढे कमी करून  48.50 रुपये केले आहेत.

Gautam Adani's company led adani total gas cuts cng png prices | गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात

गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात

गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी टोटल गॅसने पीएनजी आणि सीएनजीच्या दरात मोठी कपात केली आहे. अदानी टोटल गॅसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, पीएनजीची किंमत 3.20 रुपये प्रती एससीएम, तर सीएनजीच्या दरात 4.7 रुपये प्रती किलो ग्रॅम, एवढी कपात करण्यात आली आहे.

यापूर्वी महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. कंपनीने पीएनजीचे दर चार रुपये प्रती घनमीटर एवढे कमी करून  48.50 रुपये केले आहेत. तसेच, सीएनजीचे दर सहा रुपये किलोग्रॅमने कमी करून 80 रुपये प्रती किलो ग्रॅम केले आहेत.

तेल मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील गॅस ऑपरेटर्सना स्थानिक पातळीवर उत्पादित गॅसचे वाटप वाढविण्याच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा केली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वाढलेले वाटप हे देशभरातील घरांमध्ये ऑटोमोबाईल आणि पाईपने एलपीजी पुरवठ्यासाठी सीएनजी पुरवठ्याची 94 टक्के मागणी पूर्ण करेल.


 

 

 

 

Web Title: Gautam Adani's company led adani total gas cuts cng png prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.