लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांनी उसळी घेतल्यामुळे समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा जगातील टॉप-२० अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटकावले आहे. त्यांची संपत्नी ४.३८ अब्ज डॉलरनी वाढून ६४.२ अब्ज डॉलर झाली असून ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये त्यांनी १८ वे स्थान पटकावले आहे.
मंगळवारी अदानी समूहातील १० कंपन्यांचे बाजारमूल्य एकाच दिवसात ६३,४१८.८५ कोटी रुपयांनी वाढले. त्यानंतर त्यांच्या कंपन्यांचे बाजारमूल्य १०.१६ लाख कोटींच्यावर गेले. हिंडेनबर्ग अहवालापूर्वी २४ जानेवारी रोजी ते १९.२० लाख कोटी रुपये होते. त्या तुलनेत अजूनही खूपच कमी आहे.
हिंडेनबर्गमुळे बसला होता मोठा फटका
n अमेरिकी शॉर्ट सेलर संस्था
हिंडेनबर्गने खळबळजनक अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग आपटले होते. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये गौतम अदानी हे टॉप-२० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले होते.
n सप्टेंबर २०२२ मध्ये १५४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यक्ती होते. २०२३ च्या प्रारंभापासून त्यांची संपत्ती ५६.४ अब्ज डॉलरनी घटली होती.
अरनॉल्ट यांच्या संपत्तीत मोठी घट
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत मंगळवारी एकाच दिवसात ११.२ अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत मंदी येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अरनॉल्ट हे अनेक जागतिक लक्झरी ब्रँडची मालकी असलेल्या ‘एलव्हीएमएच’चे संस्थापक आहेत. त्यांच्या कंपन्यांचे समभाग ५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. मात्र, या घसरगुंडीनंतरही त्यांची संपत्ती १९१.६ अब्ज डॉलर आहे.