Join us

देशाच्या अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'; पहिल्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 7:20 PM

आर्थिक वर्षं 2018 जूनच्या तिमाहीत विकासदर चांगलाच झेपावला आहे.

नवी दिल्ली- आर्थिक वर्षं 2018 जूनच्या तिमाहीत विकासदर चांगलाच झेपावला आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत देशातील जीडीपीमध्ये तेजी आली असून, विकासदर 7.7 टक्क्यांवरून 8.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. जून तिमाहीत सकल मूल्य संवर्धित(जीवीए)चा विकासदर 5.6 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत गेला आहे. आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले असून, जीडीपीमध्ये 8.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 18 तिमाहीतील ही सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. उत्पादन आणि कृषी क्षेत्रांमधल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक वेगळीच झळाळी मिळाली असून, ते आकडेवारीतून दिसून आलं आहे. 2011-12 च्या आधारभूत किमतीच्या अंदाजानुसार 2018-19च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 33.74 लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं मांडला होता.