देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. गेल्या पाच तिमाहींपेक्षा यावेळच्या तिमाहीचा विकास दर सर्वात कमी राहिला आहे. एप्रिल-जून या २०२४ च्या पहिल्या तिमाहीत विकास दर कमी होऊन ६.७ टक्क्यांवर राहिला आहे. गेल्या वर्षी हाच दर 7.8 टक्के होता.
चालू आर्थिक वर्षातील देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन पहिल्याच तिमाहीत 6.7 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले आहे. कृषी क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे जीडीपीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीत हाच जीडीपी 7.8 टक्क्यांवर होता. गेल्या आर्थिक वर्षाचा सरासरी विकास दर हा 8.2 टक्के राहिला होता. या आकडेवारीच्या तुलनेत या तिमाहीतील जीडीपी कमालीचा घसरला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी खर्च कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावेल, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
मुडीजने जीडीपीचा अंदाज वाढविला...
देशाचा विकास दर येण्यापूर्वी एक दिवस आधी मुडीजने आपला अंदाज व्यक्त केला होता. डीजने 2024 मध्ये वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर 2025 साठी भारताचा विकास दर अंदाज 6.4 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.