नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या काळात भारताच्या रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत २५.५ टक्क्यांची वाढ झाली. ५.७८ अब्ज डॉलरची रत्ने आणि दागिने भारताने या काळात निर्यात केले.
अमेरिकेसारख्या मुख्य बाजारपेठेकडून भारतीय रत्ने आणि दागिन्यांना असलेली मागणी वाढल्यामुळे निर्यातीत वाढ झाली आहे. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. गेल्या वर्षी एप्रिल ते मे या काळात ४.६0 अब्ज डॉलरची रत्ने आणि दागिने भारताने निर्यात केली होती. भारताच्या एकूण निर्यातीत रत्ने आणि दागिन्यांचा वाटा जवळपास १४ टक्के आहे. सूत्रांनी सांगितले की, या दोन महिन्यांच्या काळात चांदीच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे एकूण निर्यातीचा आकडा मोठा झाला. या काळात चांदीची निर्यात तब्बल १७६.१८ टक्क्यांनी वाढून ७७.३६ कोटी डॉलरवर गेली. याच काळात पैलू पाडण्यात आलेल्या हिऱ्याची निर्यात वाढून ३.७५ अब्ज डॉलरवर गेली. गेल्या वर्षी हा आकडा ३.४ अब्ज डॉलर होता.
विशेष म्हणजे २0१५-१६ या वित्त वर्षात रत्ने आणि दागिन्यांची निर्यात ११.७ टक्क्यांनी घसरून ३१.९८ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली होती.
अधिकाऱ्याने सांगितले की, निर्यातीतील ही घसरण प्रामुख्याने युरोप, जपान व चीनमधील आर्थिक मंदीमुळे होत आहे. अमेरिकेत आर्थिक स्थिती सुधारत आहे. मात्र सुधारण्याची गती अत्यंत आहे. तरीही अमेरिकेतील सुधारणेमुळे भारताच्या निर्यातीत वाढ होण्यास मदत झाली आहे. पहिल्या दोन महिन्यांत सोन्याच दागिन्यांची निर्यात १0 टक्क्यांनी घसरून ५३.५ कोटी डॉलरवर आलीे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
- ज्वेलरांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने १५0 रुपयांनी उतरून ३0,९00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.
- ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही १५0 रुपयांनी घसरून ३0,७५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. दिल्लीत तयार चांदीचा भाव १,३00 रुपयांनी घसरून ४६,१00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र १,३२५ रुपयांनी वाढून ४७,८४0 रुपये किलो झाला. काल सोने २८ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते.
रत्ने, दागिन्यांची निर्यात वाढली
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या काळात भारताच्या रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत २५.५ टक्क्यांची वाढ झाली. ५.७८ अब्ज डॉलरची रत्ने आणि दागिने भारताने
By admin | Published: July 8, 2016 01:57 AM2016-07-08T01:57:26+5:302016-07-08T01:57:26+5:30