नवी दिल्ली: अमेरिकास्थित गुंतवणूक कंपनी जनरल अटलांटिक जिओमध्ये ६ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जनरल अटलांटिक १.३४ टक्के समभाग खरेदी करत असल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहानं दिली आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये जिओमध्ये झालेली ही चौथी मोठी गुंतवणूक आहे. याआधी जनरल अटलांटिकनं एअरबीएनबी आणि उबरमध्येदेखील गुंतवणूक केली होती. जनरल अटलांटिकनं जिओमध्ये १.३४ टक्के इतकी भागिदारी खरेदी केली आहे. गेल्या चार आठवड्यांत जिओमध्ये चौथ्यांदा जिओमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. गेल्या महिन्याभरात मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्ये ६७ हजार १९४ कोटींची गुंतवणूक झाली. २२ एप्रिल रोजी जिओ आणि रिलायन्समध्ये गुंतवणूक करार झाला. फेसबुकनं जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपये गुंतवून ९.९ टक्के भागिदारी विकत घेतली. यामुळे फेसबुक जिओमधील सगळ्यात मोठी भागीदार कंपनी झाली. यानंतर अमेरिकेतल्या सिल्व्हर लेकनं फेसबुकमध्ये ५ हजार ६५६ कोटी रुपये गुंतवत असल्याची घोषणा केली. तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी सिल्व्हर लेक जगातील मोठी संस्था आहे. या कंपनीकडे ४३ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. सिल्व्हर लेकमध्ये जवळपास १०० गुंतवणूक आणि ऑपरेटिंग तज्ज्ञांची टीम आहे. सिल्व्हर लेकनंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमध्ये ११ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचं जाहीर केलं. विस्टानं जिओमध्ये २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला.
चार आठवड्यांत चौथा मोठा गुंतवणूकदार; लॉकडाऊनमध्ये जिओला बंपर लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 8:23 PM