Lokmat Money > बिझनेस न्यूज > 2 वर्षांपासून बम्पर परतावा देतोय हा शेअर, 3300 टक्क्यांची तुफान तेजी; आली आणखी एक मोठी बातमी!

2 वर्षांपासून बम्पर परतावा देतोय हा शेअर, 3300 टक्क्यांची तुफान तेजी; आली आणखी एक मोठी बातमी!

कंपनीचे मार्केट कॅप सध्या 2264 कोटी रुपये एवढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 05:01 PM2023-08-16T17:01:10+5:302023-08-16T17:01:37+5:30

कंपनीचे मार्केट कॅप सध्या 2264 कोटी रुपये एवढे आहे.

gensol engineering stock has been giving bumper returns from 2 years, a storm of 3300 percent; Big news again | 2 वर्षांपासून बम्पर परतावा देतोय हा शेअर, 3300 टक्क्यांची तुफान तेजी; आली आणखी एक मोठी बातमी!

2 वर्षांपासून बम्पर परतावा देतोय हा शेअर, 3300 टक्क्यांची तुफान तेजी; आली आणखी एक मोठी बातमी!

स्मॉल कॅप कंपनी Gensol Engineering च्या शेअरमध्ये बुधवारी सुरुवातीला तेजी दिसून आली. आज एनएसईवर हा शेअर 1850 रुपयांवर खुला झाला आणि काही वेळातच 1899 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला होता.

कसा आहे तिमाही निकाल? - 
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Gensol Engineering चा एकूण महसूल एप्रिल ते जून 2023 दरम्यान 151.70 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर यात 47 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर कंपनीचा EBITDA 179 टक्क्यांनी वाढला आहे. यादरम्यान तो 43.70 कोटी रुपये राहिला.

कोरोनानंतर रॉकेट बनलाय शेअर -
शेअर बाजारात गेल्या एकावर्षा दरम्यान Gensol Engineering च्या शेअरमध्ये 45 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांसंदर्भात बोलायचे झाल्यास, या स्टॉकच्या किंमतीत तूफान तेजी दिसत आहे. कोविड-19 नंतर कंपनीच्या एका शेअरची किंमत 60 रुपये होती. जी बुधवारी 1899 रुपयांपर्यंत पोहोचली होती. केवळ 2 वर्षांतच कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास 3300 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

किती आहे मार्केट कॅप? - 
Gensol Engineering चे मार्केट कॅप सध्या 2264 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीचा शेअर आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर होते. Gensol Engineering चा 52 आठवड्यांतील निचांक 1310.25 रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 


 

Web Title: gensol engineering stock has been giving bumper returns from 2 years, a storm of 3300 percent; Big news again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.