बर्लिन : युरोपीय संघातील (ईयू) सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला मंदीचा जबर तडाखा बसला असून, या देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२६ पर्यंत युरोझोनच्या सरासरीपेक्षा कमी दराने वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. युरोझोनचा वृद्धी दर वर्ष २०२४ मध्ये ०.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. याउलट जर्मनीची अर्थव्यवस्था ०.१ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
ईयूने जारी केलेल्या अंदाजानुसार, कमजोर जागतिक मागणी आणि कमजोर गुंतवणूक याचा फटका जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. जर्मनीतील महागाई ऑक्टोबरमध्ये कमी होऊन २.४ टक्क्यांवर आली. २०२२ मध्ये ती ११.६ टक्के होती. २०२५ ते २०२६ या कालावधीत जर्मनीच्या वृद्धी दरात किंचित सुधारणा होऊ शकते. तरीही युरोझोनच्या तुलनेत तो कमीच असणार आहे. त्यामुळे जर्मनीला दीर्घकालीन पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
अर्थव्यवस्थेवर दृष्टिक्षेप
- जर्मनीच्या जीडीपीचा वृद्धी दर २०२४ मध्ये ०.१ टक्का घसरण्याची शक्यता
- युरोझोनचा जीडीपी २०२४ मध्ये ०.८ टक्क्याने वाढण्याचा अंदाज
- ऑक्टोबर २०२४ मध्ये जर्मनीचा महागाई दर २.४ टक्क्यांवर घसरला
- २०२५-२६ मध्ये देशांतर्गत मागणीमुळे जर्मन अर्थव्यवस्थेला दिलासा मिळू शकतो.
भारतालाही स्वातंत्र्यानंतर ४ वेळा मंदीचा फटका बसलेला आहे. ही म्हणदे १९५८, १९६६, १९७३, १९८० आहेत.