Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB मध्ये खाते असल्यास मिळेल १० लाखांचा फायदा! जाणून घ्या कसा?

PNB मध्ये खाते असल्यास मिळेल १० लाखांचा फायदा! जाणून घ्या कसा?

punjab national bank : PNBने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबात माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:47 PM2021-08-24T12:47:39+5:302021-08-24T12:48:29+5:30

punjab national bank : PNBने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबात माहिती दिली आहे.

get 10 lakh rupees benefits in punjab national bank rupay select credit card check details | PNB मध्ये खाते असल्यास मिळेल १० लाखांचा फायदा! जाणून घ्या कसा?

PNB मध्ये खाते असल्यास मिळेल १० लाखांचा फायदा! जाणून घ्या कसा?

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवते. तुमच्याकडे या बँकेचे खाते असेल तर आता तुम्हाला १० लाख रुपयांचा फायदा मिळेल. तसेच, अनेक ऑफर्सही मिळतील. बँकेकडून ग्राहकांना विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड्स दिले जाते. 

आज आम्ही तुम्हाला बँकेच्या रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (PNB Rupay Select Credit Card) बद्दल माहिती देत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला खरेदी तसेच हेल्थ चेकअप पॅकेज, अपघाती विमा, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लाउंज प्रोग्राम आणि कॅशबॅकसह अनेक सुविधा मिळेल. PNBने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबात माहिती दिली आहे.

PNB कडून ट्विट
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, पंजाब नॅशनल बँकेच्या रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डद्वारे आनंदाचा अनुभव घ्या. यामध्ये तुम्हाला अनेक खास ऑफर्स आणि सवलतींचा लाभ मिळेल. 

रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (Rupay Select Credit Card)
>> कॉम्प्लिमेंट्री गोल्फ सत्र
>> कॉम्प्लिमेंटरी स्पा सेशन
>> जिम मेंबरशिप
>> हेल्थ चेकअप पॅकेज
>> डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लाउंज
>> अपघाती विमा 10 लाख रुपयांपर्यंत

ऑफिशियल वेबसाइट
या कार्डबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://pnbcard.in/login/types6.html  या लिंकला भेट देऊ शकता.

कार्डची खास फीचर्स आणि ज्वाइनिंग फी, जाणून घ्या...
>> मिनिमम ज्वाइनिंग फी – 500 रु.
>> वार्षिक कार्ड फी– NIL (जर एका तिमाहीत कार्ड वापरले तर)
>> पहिल्या वापरात 300 पेक्षा जास्त रिवॉर्ड प्वाइंट्स मिळतील
>> रिटेल मर्चंटाइज्डला दुप्पट रिवार्ड प्वाइंट्स मिळतील
>> PNB Genie अॅप - वन स्टॉप सोल्यूशन
>> कॉम्प्लिमेंट्री डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लाउंज प्रोग्राम
>> युटिलिटी बिल आणि रेस्टॉरंटवर एक्सक्लुझिव्ह कॅशबॅक ऑफर देखील मिळतील
>> विमा संरक्षणची सुविधा
>> 300 हून अधिक मर्चेंट ऑफर्स देखील मिळतील.

Web Title: get 10 lakh rupees benefits in punjab national bank rupay select credit card check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.