सध्या पोस्ट खात्यात अशा बऱ्याच योजना सुरू करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये बँकेपेक्षाही उत्तम रिटर्न मिळतात. यामुळे मोठ्या संख्येने लोक या योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजना रिटर्न्ससोबतच सिक्युरिटीही देते ज्यामुळे या योजनांवर लोकांचा विश्वास कायम आहे. यासह या सर्व योजनांच्या माध्यमातून इन्कम टॅक्सदेखील सहज वाचवता येऊ शकतो.
५ वर्षांसाठी स्किम
जर तुम्ही पाच वर्षांसाठी पोस्ट खात्यात पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला बँकेपेक्षा अधिक व्याज मिळेलर. बँक पाच वर्षाच्या स्किमवर सर्वाधिक ५.५ टक्के व्याज देते. तर त्याच्या तुलनेत पोस्ट ऑफिसचे व्याजदर हे अधिक आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी ६.८ टक्क्यांचं व्याज मिळतं.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सध्या ६.८ टक्क्यांचं व्याज मिळतं. उत्तम रिटर्नसोबतच या ठिकाणी सिक्युरिटीही मिळते. तसंच ८० सी अंतर्गत करात सूटही घेतली जाऊ शकते.
पब्लिक प्रोव्हिडेंट फंड
ही केवळ एक पोस्ट ऑफिसची स्किम नाही. परंतु याची लोकप्रियता एका पोस्ट ऑफिस स्किमप्रमाणे अधिक आहे. या स्किमवर सध्या ७.१ टक्के व्याज देण्यात येत आहे. परंतु अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करण्याच्या विचारात तुम्ही नसाल तर हा उत्तम पर्याय नाही.