Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता बचत खात्यात मिळवा FD सारखा परतावा; कधीही पैसे काढू शकता? कशी सुरू करायची योजना?

आता बचत खात्यात मिळवा FD सारखा परतावा; कधीही पैसे काढू शकता? कशी सुरू करायची योजना?

Auto Sweep Service : तुम्हाला FD मधून चांगला परतावा मिळतो. पण, तुमची रक्कम ठराविक कालावधीसाठी निश्चित केली जाते. पण, तुम्ही बँकेची एक सेवा वापरुन एफडीसारखा परतावा मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:11 AM2024-11-20T11:11:54+5:302024-11-20T11:13:23+5:30

Auto Sweep Service : तुम्हाला FD मधून चांगला परतावा मिळतो. पण, तुमची रक्कम ठराविक कालावधीसाठी निश्चित केली जाते. पण, तुम्ही बँकेची एक सेवा वापरुन एफडीसारखा परतावा मिळवू शकता.

Get FD-like returns in savings accounts now; Can you withdraw at any time? How to start planning? | आता बचत खात्यात मिळवा FD सारखा परतावा; कधीही पैसे काढू शकता? कशी सुरू करायची योजना?

आता बचत खात्यात मिळवा FD सारखा परतावा; कधीही पैसे काढू शकता? कशी सुरू करायची योजना?

Auto Sweep Service : शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळत असला तरी जोखीमही खूप आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक पारंपरिक बचत ठेव योजनेत पैसे गुंतवतात. सध्या एफडी योजनेत चांगला परतावा मिळत आहे. पण, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्येच (Saving Account) एफडीप्रमाणे व्याजदर मिळवू शकता. हो, तुम्ही बरोबर वाचलत. काही बँका ऑटो स्वीप सेवा देतात. यामध्ये तुमच्या बचत खात्यातच एफडीसारखी सुविधा मिळते.

ऑटो स्वीप सेवा म्हणजे काय?
ऑटो स्वीप सेवा ही प्रत्येक बँकेद्वारे दिली जाणारी सुविधा आहे. ही सेवा सुरू करून तुम्ही तुमच्या बचत खात्यात अधिक व्याज मिळवू शकता. या सेवेमुळे अतिरिक्त पैशावर अधिक व्याज मिळण्यास मदत होते. तुम्ही ही सेवा सुरू केल्यानंतर तुमच्या खात्यातील रक्कम विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, ती स्वयंचलितपणे मुदत ठेव (FD) मध्ये हस्तांतरित केली जाते. ही मर्यादा ठरवण्याचा अधिकारही तुम्हाला आहे. मर्यादेपेक्षा जास्त पैसे असल्यास, जास्तीची रक्कम आपोआप एफडी होते. यासह, तुम्हाला तुमच्या ठेवीवर FD प्रमाणेच व्याज मिळते.

काय फायदा होतो?
जेव्हा तुम्ही बँकेतून सामान्य पद्धतीने FD करता तेव्हा तुमचे पैसे ठराविक वेळेसाठी निश्चित होतात. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे वेळेपूर्वी काढू शकत नाही. परंतु, जर तुम्ही ऑटो स्वीप सेवा वापरत असाल तर तुमचे पैसे आपोआप FD मध्ये जमा होतात आणि तुम्ही FD चे पैसे कधीही काढू शकता. सामान्य खात्यात पैसे जमा केल्याप्रमाणे तुम्ही एफडीचे पैसे काढू शकता. ऑटो स्वीप सर्व्हिस अंतर्गत FD वर मिळणारे व्याज प्रत्येक बँकेत बदलते.

Web Title: Get FD-like returns in savings accounts now; Can you withdraw at any time? How to start planning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.