नवी दिल्ली: सध्याच्या काळात बहुतांश लोकांना OTT वर चित्रपट किंवा वेब सीरिज पाहण्याची आवड आहे. पण, या प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि शो पाहण्यासाठी तुम्हाला मेंबरशिप फी भरावी लागते. या अॅप्सची फी देखील खूप जास्त असल्यामुळे अनेकांना ती परवडत नाही. पण, आता तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य मेंबरशिप मिळवता येणार आहे. यासाठी तुम्हाला Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea यांसारख्या कंपन्यांचे पोस्टपेड प्लॅन्स घ्यावे लागतील. या प्लॅन्सचे दर एक हजार रुपयांपेक्षा कमी आहेत आणि यात तुम्हाला OTT अॅप्स वापरता येतील.
या पोस्टपेड प्लॅनमध्ये OTT फायदे मोफत मिळतील
आज आम्ही Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea च्या 1000 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात केवळ डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सारखे फायदेच नाही, तर टॉप OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. प्रत्येक कंपनी एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत अशा अनेक प्लॅन्स देत आहे.
- Airtel Rs 999 पोस्टपेड प्लॅन
एअरटेलचा हा पोस्टपेड प्लॅन 999 रुपयांचा आहे. हा प्लॅन घेणार्या यूझरला प्रत्येक महिन्यासाठी 150GB डेटा मिळेल, जो 200GB पर्यंत रोलओव्हर लाभांसह येईल. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचे फायदे देखील मिळतील. या प्लॅनसोबत OTT एका वर्षाचे Amazon Prime Video आणि Disney + Hotstar मोबाईल अॅप सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल. या प्लॅनची वैधता वापरकर्त्याच्या बिल सायकलवर अवलंबून असेल.
- जिओ 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि एकूण 200GB इंटरनेट मिळेल. या प्लानमध्ये 500GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर देखील देण्यात आला आहे. OTTमध्ये यात तुम्हाला Jio अॅप्ससह Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. या प्लॅनची वैधता वापरकर्त्याच्या बिल सायकलवर अवलंबून असते.
- Vi चा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Vodafone Idea किंवा Vi चा हा 999 रुपयांचा प्लॅन आहे. तीन अॅड-ऑन कनेक्शनसह हा प्लॅन येतो. यात तुम्हाला एकूण 220GB इंटरनेट, पहिल्या कनेक्शनसाठी 140GB डेटा आणि दुसऱ्या कनेक्शनसाठी 40GB मिळेल. कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसोबतच या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी 3 हजार एसएमएस सुविधाही मिळणार आहे. या प्लानमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा पर्यायही दिला जात आहे. स्ट्रीमिंग अॅप्समध्ये, तुम्हाला Amazon Prime Video चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, Disney+Hotstar च्या मोबाईल व्हर्जनचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन आणि Vi Movies आणि TV वर पाहता येईल.