नवी दिल्ली - कर्ज बुडवून, घोटाळे करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता कंपन्यांनी सर्व संचालकांच्या पासपोर्टची माहिती सरकारकडे जमा करण्याची सक्ती केली जाऊ शकते. कंपनी अफेअर्स मंत्रालय याबाबत विचार करीत आहे.आधी विजय मल्ल्या, त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोकसी यांनी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून पळ काढला. अशा घटनांमुळे कर्ज थकीत अथवा बुडीत असलेल्या मोठ्या व्यावसायिक कर्जदारांच्या पासपोर्टची माहिती गोळा करण्याच्या सूचना केंद्र सरकारने या आधीच दिल्या होत्या. त्यानंतर, आता कंपनीतील सर्वच संचालकांच्या पासपोर्टची माहिती मागविण्याबाबत विचार सुरू आहे.कारवाईआधीच आर्थिक गुन्हेगार भारतीय न्यायकक्षेच्या बाहेर गेल्याचे दिसून आले आहे. यामुळे कंपनीतील प्रत्येक संचालकाच्या पासपोर्टची माहिती डिजिटल स्वरूपात जमा केल्यास घोटाळे करून देशातून पळणाºया संचालकांना वेळीच रोखता येणे सोपे होईल.
संचालकांच्या पासपोर्टची माहिती घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:42 AM