Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातली दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी देतेय कर्ज, असा घ्या फायदा

देशातली दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी देतेय कर्ज, असा घ्या फायदा

देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी कर्जवाटप करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 08:04 AM2019-07-07T08:04:32+5:302019-07-07T08:04:43+5:30

देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी कर्जवाटप करत आहेत.

get interest free loan through icici bank paylater service | देशातली दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी देतेय कर्ज, असा घ्या फायदा

देशातली दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी देतेय कर्ज, असा घ्या फायदा

नवी दिल्लीः देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी कर्जवाटप करत आहेत. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आपल्या ग्राहकांना बिनव्याजी कर्ज देत आहे. आपण बँकेकडून काही मर्यादेपर्यंत कर्ज घेतल्यास त्यावर कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही. परंतु आयसीआयसीआय बँक(ICICI Bank) काही नियमांच्या आधारवरच हे कर्ज देत आहे. ICICI Bankच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँक ग्राहकाला PayLater अकाऊंटच्या माध्यमातून कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज देते.

पे लेटर अकाउंट एक डिजिटल क्रेडिट प्रोडक्ट आहे. जे एका क्रेडिट कार्डसारखं काम करतं. जिथे तुम्ही आधी खर्च करता आणि नंतर त्याचे पैसे भरता. या सुविधेंतर्गत 30 दिवसांसाठी ठरावीक रक्कम आपल्याला कर्जाच्या स्वरूपात दिली जाते. मुदत पूर्ण होण्याआधीच हे कर्ज फेडावं लागणार आहे. बँक या PayLater सुविधेच्या माध्यमातून 45 दिवसांत इंटरेस्ट फ्री कर्ज देते. ICICI Bankची PayLater सुविधा इंटरनेट बँकिंग, iMobile आणि पॉकेट्स वॉलेट पर उपलब्ध आहे.


या सुविधेंतर्गत मिळालेल्या रकमेतून क्रेडिट कार्डचं बिल भरू शकत नाही. तसेच इतरांनाही हे पैसे हस्तांतरित करता येत नाही. आयसीआयसीआय बँक(ICICI Bank)  Paylater अकाऊंटच्या माध्यमातून 5 हजार ते 25 हजारांपर्यंत पैसे घेऊ शकता. कर्जाच्या स्वरूपात अजून जास्तीची रक्कम मिळणं ही तुमच्या क्रेडिट स्कोरवर अवलंबून असते. Paylater सुविधेत तसं कर्जावर कोणतंही व्याज द्यावं लागत नाही. परंतु दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्यास बँकेद्वारे लागू करण्यात आलेले लेट पेमेंट चार्जेस द्यावे लागणार आहेत.  

Web Title: get interest free loan through icici bank paylater service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.