Join us

मोफत मिळणार Jio Coin; डाऊनलोडपासून रिडीमपर्यंत पाहा सोपी पद्धत, जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:17 IST

Jio Coin News: रिलायन्स जिओच्या कॉईनबद्दल अनेक चर्चा आहेत. पूर्वी ही क्रिप्टोकरन्सी मानली जात होती, पणं हे नक्की आहे काय ते जाणून घ्या.

Jio Coin News: रिलायन्स जिओच्या कॉईनबद्दल अनेक चर्चा आहेत. पूर्वी ही क्रिप्टोकरन्सी मानली जात होती, परंतु प्रत्यक्षात ते एक रिवॉर्ड टोकन आहे. ते मोफत मिळू शकेल का, ते कसं मिळवायचं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. ही कॉईन विनामूल्य कशी मिळवायची हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

या स्टेप्स करा फॉलो

  • यासाठी तुम्हाला जिओ अॅप कआणि सर्व्हिसेसचा वापर करावा लागेल.
  • जिओ कॉइन मोफत मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अँड्रॉइड फोन किंवा आयओएस फोन किंवा मॅक किंवा विंडो अथवा अँड्रॉइड टीव्हीमध्ये JioSphere अॅप डाऊनलोड करावे लागेल.
  • या अॅपमध्ये रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला मोफत जिओ कॉईन मिळू शकते.
  • JioSphere क्रोम, सफारी सारख्या वेब ब्राउजरप्रमाणे काम करतं. गेम खेळणं, लेख वाचणे, संगीत ऐकणं, माहिती सर्च करणं यासाठीही या अॅपचा वापर केला जाऊ शकतो. 

जिओ कॉईनसाठी काय करावं लागेल?

  • रिलायन्स जिओ कॉइन मिळवण्यासाठी तुम्हाला अॅपवर काही कामं करावी लागतील जसं की जिओ अॅप किंवा त्याच्या पार्टनर्सच्या प्रमोशन जाहिराती किंवा व्हिडिओ पाहणं.
  • जिओ प्लॅटफॉर्मची फीचर्स वापरावी लागतील.
  • याशिवाय जिओ किंवा त्याच्या भागीदारांच्या स्पर्धा, इव्हेंट्स किंवा कॅम्पेनमध्ये भाग घेऊनही तुम्ही ते मिळवू शकता.
  • या कामांच्या बदल्यात टोकन म्हणून एक कॉईन दिलं जातं जे वॉलेटमध्ये जमा केलं जाईल.
  • तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईल नंबरवर नोंदणी करावी लागेल आणि जास्तीत जास्त वापर करावा लागेल. 

जिओ कॉईन कुठे वापरता येईल?

हे कॉईन तुम्ही जिओच्या सेवांसाठी वापरू शकता. जसं की मेंबरशिप प्लॅनवर सूट मिळणं. याशिवाय फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कोणत्याही शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ते वापरता येतील. जिओमार्ट रिलायन्स पेट्रोल पंप आणि इतर ऑफलाइन रिलायन्स स्टोअर्समध्येही या कॉईन्सद्वारे पेमेंट करता येईल.

टॅग्स :जिओक्रिप्टोकरन्सी