Join us

JIO ची उद्यापासून पैसे मोजा, सेवा मिळवा ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 9:17 AM

रिलायन्स जिओने दिलेल्या अनलिमिटेड मोफत इंटरनेट सेवा अनलिमिटेड कॉलिंगचा आज अखेरचा दिवस आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - 1 एप्रिलपासून जिओची ‘हॅप्पी न्यू इअर’ मोफत सेवा बंद होणार आहे. सहा महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या या ऑफरनुसार ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि डेटा प्लान देण्यात आला होता. मात्र आता ही मोफत सेवा बंद होत असून ग्राहकांना इतर पर्याय देण्यात आले आहेत. जिओची प्राईम मेंबरशीप हवी असल्यास आज म्हणजेच 31 मार्च शेवटची मुदत आहेत. 31 मार्चनंतर ही ऑफरही बंद केली जाणार आहे.  प्राईम मेंबरशीप घेतल्यास दर महिन्याला 303 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 28 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. 
 
प्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ 50 टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आलं आहे. याशिवाय जिओनं 499 रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. प्राईम मेंबरशीपसाठी यूजर्सला 99 रुपये द्यावे लागणार आहेत. यानंतर 12 महिन्यांसाठी 303 रुपयांचा प्लान घेऊन हॅप्पी न्यू इअर ऑफरमध्ये  मिळणा-या सुविधांचा पुढील एक वर्षापर्यंत फायदा घेऊ शकतात.
 
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या. 
 
प्राईम मेंबरशीप न घेतल्यास 1 एप्रिलपासून तुम्हाला रिचार्ज करावा लागेल. माय जिओ अॅपवर तुम्हाला प्रीपेडचे विविध प्लान दाखवले जातील. त्याप्रमाणे तुम्हाला एक प्लान निवडून रिचार्ज करावा लागेल.  जिओ स्टोअर वरुनही तुम्ही रिचार्ज करु शकता. जर तुम्ही पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्हाला कोणताही एक प्लान घ्यावा लागेल. आपलं सीम प्रीपडे आहे की पोस्टपेड हे ओळखण्यासाठी माय जिओ अॅपवर लॉग इन केल्यानंतर माय प्लानवर जा. तिथे तुम्हाला हॅप्पी न्यू ईयर दिसेल. तिथेच वरती तुम्ही प्रीपेड ग्राहक आहात की पोस्टपेड हे दिसेल. 
 
जिओ बंद करायचे असल्यास -
 
प्रिपेड ग्राहकांसाठी -
तुम्हाला जर जिओ सिम बंद करायचे असल्यास सिम कार्डमध्ये झिरो बॅलन्स ठेवून ते 90 दिवसापर्यंत वापरु नका. असे केल्यास तुमचे सिम आपोआप बंद होईल. 
 
पोस्टपेड ग्राहकांसाठी - 
जर तुम्ही पोस्टपेड वापरकर्ते असाल आणि तुम्हाला तुमचे सिमकार्ड बंद करायचे असेल तर तुम्हाला जियो स्टोर मध्ये जावे लागेल. 
 
कसे व्हाल जिओचे प्राईम मेंबर?
- प्राईम मेंबर होण्यासाठी सर्वात आधी jio.com वर जा.
- होम पेजवर Get Jio Prime हे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर 10 डिजिट असणारा जिओ नंबर टाका
- यासाठी तुम्हाला 99 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे.
- दरम्यान, कंपनी आपल्या यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 50 रुपयांचं कॅशबॅकही देणार आहे. म्हणजे तुम्ही 49 रुपयात जिओचे प्राईम मेंबर होऊ शकतात.
 
प्राईम मेंबरशिप न घेतल्यास  काय आहेत प्लॅन
-149 रुपये : 2 जीबी 4G डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, रोमिंग फ्री,  वैधता 28 दिवस
- 303 रुपये : "हॅप्पी न्यू इअर" प्लॅनमधील सर्व सुविधा, प्रती दिन 1 जीबी 4G डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 28 दिवस
- 499 रुपये : प्रती दिन 2 जीबी 4G डाटा म्हणजेच एकूण 56 जीबी 4G डाटा, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 28 दिवस
- 999 रुपये : 60 जीबी 4G डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 60 दिवस 
- 1999 रुपये : 125 जीबी 4G डाटा,  डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 90 दिवस 
- 4999 रुपये : 350 जीबी 4G डाटा,  डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 180 दिवस
- 9999 रुपये : 750 जीबी 4G डाटा, डाटासाठी कोणताही FUP लिमिट नाही, फ्री लोकल-एसटीडी कॉल, वैधता 360 दिवस