Join us  

जिओचा नवा धमाका, कॅशबॅकमधून मिळवा मोफत जिओ प्राइम मेंबरशिप

By admin | Published: March 23, 2017 4:32 PM

99 रुपयांचा भार हलका व्हावा यासाठी आता कंपनीनं आपल्या ग्राहकांना एक नवी कॅशबॅक ऑफर आणली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची ग्राहकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. रिलायन्स जिओनं दिलेल्या मोफत ऑफरमुळे अनेक जण रिलायन्स जिओशी जोडले गेले आहेत. मात्र रिलायन्स जिओची ही फ्री ऑफर 31 मार्चनंतर बंद होणार आहे. 1 एप्रिलपासून जिओ ग्राहकांकडून 4जी सेवा पुरवण्यासाठी पैसे घेणार आहे. 31 मार्चनंतर रिलायन्स जिओच्या ग्राहकाला प्राईम मेंबरशिपसाठी 99 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर महिन्याला 303 रुपये भरून रिलायन्स जिओची 4 जी सेवा उपभोगता येणार आहे. मात्र 99 रुपयांचा भार हलका व्हावा यासाठी आता कंपनीनं आपल्या ग्राहकांना एक नवी कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार जिओ वापरकर्त्याला मोफत सब्सक्रिप्शन मिळू शकतं. रिलायन्स जिओच्या JIO MONEY अ‍ॅपच्या ऑफरमध्ये तुम्हाला हा फायदा मिळणार आहे. जिओनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. जिओ मनीवरून रिचार्ज केल्यास यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 50 रुपये कॅशबॅक मिळेल. तर प्राईम मेंबरशिपसाठी यूजर्सला 99 रुपये सब्सक्रिप्शन फी आणि 303 रुपये दर महिना शुल्क द्यावं लागणार आहे. मात्र जर वापरकर्त्यानं 99 रुपयांची मेंबरशिप आणि 303 रुपयांचं टेरिफ रिचार्ज केल्यास या दोन रिचार्जवर (50+50) असं 100 रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही भरलेले 100 रुपये तुम्हाला परत मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही भरलेलं 99 रुपयांचं मेंबरशिप सब्सक्रिप्शन कॅशबॅकच्या माध्यमातून पुन्हा तुम्हालाच मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर असल्यानं तुम्हाला पहिले रिचार्ज करावं लागणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत तुम्हाला कॅशबॅक मिळेल. कंपनीची ही ऑफर यूजर्ससाठी फायद्याची ठरू शकते.