मुंबई : देशातील अग्रणी सुपर मार्केट साखळी असलेल्या ‘बिग बाजार’मध्ये ‘फ्री शॉपिंग सेल’ सुरू झाला आहे. या अंतर्गत ४००० रुपयांची खरेदी केल्यास ग्राहकांना तेवढ्याच रकमेचे कॅशबॅक व कुपन्स मिळणार आहेत. ३ आॅक्टोबरपर्यंत हा सेल आहे. बिग बाजारच्या या सेलमध्ये ४००० रुपयांची खरेदी केल्यास ग्राहकांना फ्युचर पे व्हॉलेटमध्ये ५०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. त्याखेरीज १००० रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स व्हाउचर, १००० रुपयांचे किचनवेअर व्हाउचर्स, ५०० रुपयांचे गृहसजावट व्हाउचर व १००० रुपयांचे फॅशनसंबंधीच्या खरेदीचे व्हाउचर मिळेल.
बिग बाजारचे सीईओ सदाशिव नायक यांनी सांगितले की, ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी बिग बाजारने यंदा आॅफर्समध्ये वाढ केली आहे. अधिकाधिक ग्राहकांशी जोडण्यासाठी हा सेल सुरू झाला आहे. हा सेल देशभरातील १४२ शहरांमधील ३५३ बिग बाजार, फूड बाजार, फॅशन अॅट बिग बाजार (एफबीबी) व हायपर सिटी मॉल व सुपर मार्केटमध्ये सुरू आहे. सेलमध्ये किराणा, धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी सर्वच उत्पादनांवर मोठी सवलत दिली जात आहे. बिग बाजारने दैनंदिन गरजेच्या १५०० वस्तूही स्वस्त केल्या आहेत. एचडीएफसी डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे ३५०० रुपयांहून अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ७ टक्के अतिरिक्त सवलतसुद्धा मिळणारआहे.